छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली अमृत संस्थेच्या योजनांची माहिती देणारी बैठक - अमृत महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली अमृत संस्थेच्या योजनांची माहिती देणारी बैठक

अमृतमित्र प्रसाद पैठणकर यांच्या पुढाकारातून आयोजन

छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली अमृत संस्थेच्या योजनांची माहिती देणारी बैठक मुख्य फोटो
छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली अमृत संस्थेच्या योजनांची माहिती देणारी बैठक अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : अमृतमित्र प्रसाद पैठणकर यांच्या माध्यमातून एन-४ आणि पारिजात नगर परिसरातील लक्ष्यित गटातील व्यक्तींची अमृत संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यालयात एक छोटी, पण मार्गदर्शक बैठक आयोजित करण्यात आली. प्रसाद पैठणकर हे अमृतमित्र म्हणून कार्यरत असून, त्यांच्या संपर्कातील लक्ष्यित गटातील नागरिकांना कार्यालयात आमंत्रित करून योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची सोप्या भाषेत या बैठकीत माहिती देण्यात आली. विशेषतः ड्रोन प्रशिक्षण, अमृत बेकरी, सोलार इन्स्टॉलेशन टेक्निशियन अर्थात अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण, अमृत आयात-निर्यात, अमृतपेठ, अमृत आरीवर्क, अमृत ग्लॅमर (ब्युटी पार्लर), तसेच अमृत उद्यम कौशल्य प्रशिक्षण (EDP) या योजना आणि प्रशिक्षणांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय संस्थेच्या इतर उपक्रमांचीदेखील थोडक्यात माहिती देण्यात आली.

उपस्थितांना योजनांविषयी आवश्यक कागदपत्रे, अर्जप्रक्रिया आणि पुढील टप्प्यांबाबत स्पष्ट मार्गदर्शन करण्यात आले. अशा प्रकारे अमृतमित्रांच्या सहकार्यामुळे योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचत असून, अधिकाधिक नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 18-02-2026 News publication date | Time: 07:05 PM News publication time | Views: 51 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 18-02-2026 News publication date | Time: 07:05 PM News publication time | Views: 51 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement