खुल्या प्रवर्गातील लघुउद्योजक व व्यावसायिकांना व्यवसायवृद्धीची सुवर्णसंधी; ग्राहकांना होणार दर्जेदार उत्पादनांची उपलब्धता
नाशिक : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले जातात. अमृतपेठ थेट बाजारपेठ हा त्यापैकीच एक महत्त्वाकांक्षी उपक्रम असून, त्याअंतर्गत नाशिक शहरात २१ आणि २२ फेब्रुवारी २०२६ रोजी अमृतपेठ प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
लघुउद्योजक आणि छोट्या व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांची विक्री अधिक व्यापक पातळीवर करता यावी आणि त्यांची व्यवसायवृद्धी व्हावी, हा त्यामागचा हेतू असून, नाशिकमध्ये अमृतपेठ एक्झिबिशन प्रथमच आयोजित केले जात आहे. दोन दिवसांच्या स्टॉलसाठी अत्यल्प शुल्क आकारले जाणार असून, स्टॉलसाठी जागा मर्यादित आहेत. त्यामुळे संस्थेच्या लक्ष्यित गटातील व्यावसायिकांनी तातडीने नोंदणी करावी, असे आवाहन अमृतपेठ थेट बाजारपेठ उपक्रमाचे नाशिक व्यवस्थापक निखिल जोशी यांनी केले आहे.
यामध्ये सहभागी होणाऱ्या लघुउद्योजकांना 'अमृतपेठ' या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मोफत नोंदणी करता येणार आहे. तसेच सहभागी स्टॉलधारकांना अमृतपेठ ऑफलाइन उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल अमृत संस्थेचे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. प्रदर्शनस्थळी स्वतंत्र टेबल, दोन दिवसांच्या स्टॉलसाठी स्वतंत्र सुरक्षित हॉलव्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल गटातील व्यावसायिकांसाठी हे प्रदर्शन म्हणजे व्यवसायवृद्धीची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे अधिकाधिक जणांनी या संधीचे सोने करण्याकरिता नाशिक कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन निखिल जोशी यांच्यासह अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक संजय गोसावी व अमृतमित्र मयूर हातवळणे यांनी केले आहे.
अमृतपेठ थेट बाजारपेठ
दिनांक : २१ आणि २२ फेब्रुवारी २०२६
वेळ : सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत
स्थळ : स्वा. वि. दा. सावरकर हॉल, परब नगर,
वंदना पार्क सोसायटीच्या मागे,
बापू बंगल्याजवळ, इंदिरानगर. नाशिक
अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क : ९८५०२०८७७७
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment