ब्राह्मण बिझनेस फोरम करणार अमृत संस्थेसोबत काम - अमृत महाराष्ट्र

ब्राह्मण बिझनेस फोरम करणार अमृत संस्थेसोबत काम

उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी नवी योजना आणण्याचे विजय जोशी यांचे आश्वासन

ब्राह्मण बिझनेस फोरम करणार अमृत संस्थेसोबत काम मुख्य फोटो
ब्राह्मण बिझनेस फोरम करणार अमृत संस्थेसोबत काम अतिरिक्त फोटो

कोल्हापूर : 'खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी, त्यांच्यातून उद्योजक घडवण्यासाठी कार्यरत असलेल्या अमृत संस्थेसोबत काम करण्यासाठी ब्राह्मण बिझनेस फोरम (बीबीएफ) उत्सुक आहे. या संस्थेच्या योजनांचा लाभ घेऊ, तसेच राज्यभर त्यांचा प्रसार करू,' अशी ग्वाही 'बीबीएफ' या ब्राह्मण उद्योजकांच्या समूहाने दिली आहे. अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्यासोबत कोल्हापूरमधील हॉटेल मराठा रेसिडेन्सीमध्ये झालेल्या विशेष बैठकीवेळी या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली. वाहतूक आणि विपणन (ट्रान्स्पोर्टेशन अँड मार्केटिंग) याबद्दलच्या या समूहाने मांडलेल्या समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी अमृत संस्थेतर्फे तातडीने नवी योजना राबवली जाईल, असा शब्द जोशी यांनी या वेळी दिला. 

या बैठकीला बीबीएफ ग्रुपचे अध्यक्ष राजन छत्रे, अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रथमेश कुलकर्णी, जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी, सांगली जिल्हा उपव्यवस्थापक अभिजित कुलकर्णी, पंचगंगा बँकेचे श्री. टोपकर यांच्यासह बीबीएफ ग्रुपचे सर्व उद्योजक उपस्थित होते.

प्रशांत जोशी यांच्यासह 'बीबीएफ'ची एक बैठक यापूर्वी झाली होती. त्यात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर 'बीबीएफ'कडून व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली. त्यानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात जोशी यांनी सर्व उद्योजकांशी मनमोकळेपणे संवाद साधून त्यांच्या व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणींविषयी माहिती जाणून घेतली. अमृत संस्थेच्या व्यावसायिकांसाठी असलेल्या योजनांची माहिती त्यांनी दिली. तसेच, सर्वांनी अमृतपेठ प्लॅटफॉर्मवर नोंदणी करून आपल्या व्यवसायाची वाढ करावी असेही त्यांनी सुचवले. अमृत संस्थेकडून काही नावीन्यपूर्ण योजनांची अपेक्षा असल्यास त्याबद्दल कळवावे, असेही जोशी यांनी सुचवले. 

सर्व उद्योजकांनी अमृत संस्थेसोबत काम करून संस्थेच्या योजनांचा राज्यभर प्रसार करण्याची ग्वाही दिली. काही उद्योजकांनी आपल्या उद्योगवाढीसाठी ट्रान्स्पोर्टेशन व मार्केटिंगच्या अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले. त्यावर जोशी यांनी एक नवी योजना तयार करून सर्व उद्योजकांना या समस्येतून बाहेर काढू, असे आश्वासन दिले. त्या अनुषंगाने लगेच संबंधितांना आदेशही दिले. एकंदरीत ही बैठक फलदायी ठरली. सर्वांनी अमृत संस्थेचे आभार मानले.

या वेळी अमृत संस्थेचे एक लाभार्थी अभिजित कुलकर्णी यांनी योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ असल्याचे मत या वेळी मांडले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Prashant Joshi News publisher name | Date: 20-02-2026 News publication date | Time: 03:46 PM News publication time | Views: 385 Number of times this news has been viewed | District: kolhapur Related district of the news
Publisher: Prashant Joshi News publisher name | Date: 20-02-2026 News publication date | Time: 03:46 PM News publication time | Views: 385 Number of times this news has been viewed | District: kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement