सांगलीत २४ फेब्रुवारीला अमृत शासकीय योजना संवाद मेळावा - अमृत महाराष्ट्र

सांगलीत २४ फेब्रुवारीला अमृत शासकीय योजना संवाद मेळावा

पालकमंत्री कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र आणि अमृत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

सांगलीत २४ फेब्रुवारीला अमृत शासकीय योजना संवाद मेळावा मुख्य फोटो
मुख्य फोटो

सांगली : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रकारच्या योजना राबवते, त्यांना उद्योजकतेचे प्रशिक्षण देणारे कार्यक्रमही आयोजित करते. जिल्हा उद्योग केंद्र ही शासकीय संस्था उद्योग-व्यवसायांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यामध्ये वाढ करण्याचे काम करते. या संस्थांच्या योजनांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने सांगलीत २४ फेब्रुवारी रोजी अमृत शासकीय योजना संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सांगली पालकमंत्री कार्यालयाकडून हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमामध्ये सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी आणि अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार हे प्रमुख वक्ते विविध शासकीय योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन करणार आहेत. उपस्थितांना आपल्या मनातील प्रश्न व शंका विचारता येणार असून, शंकांचे निरसन करून घेता येणार आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम सांगलीत प्रथमच होत असून, अधिकाधिक जणांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून शासकीय योजनांची माहिती करून घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री कार्यालय, अमृत जिल्हा कार्यालय आणि जिल्हा उद्योग केंद्र सांगली यांच्यातर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश मोफत आहे; मात्र नावनोंदणी आवश्यक आहे.

सहभागी होण्यासाठी पुढील लिंकवर नावनोंदणी करावी. https://forms.gle/1xFrWGvT3hGeXHty7 

दिवस : मंगळवार, २४ फेब्रुवारी २०२६

वेळ : सायंकाळी चार ते सात

स्थळ : खरे मंगल कार्यालय, विश्रामबाग, सांगली 

अधिक माहितीसाठी संपर्क :

पालकमंत्री कार्यालय : 8806088064, 7498916421

अमृत जिल्हा कार्यालय, 

अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर,

राजवाडा, सांगली ४१६४१६

शैलेंद्र जहागीरदार (जिल्हा व्यवस्थापक, अमृत) : ९११२२२८७६६ / ७९७२८३०७५७ / ८२७५३७८०१९

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Shailendra Jahagirdar News publisher name | Date: 21-02-2026 News publication date | Time: 03:15 PM News publication time | Views: 56 Number of times this news has been viewed | District: sangli Related district of the news
Publisher: Shailendra Jahagirdar News publisher name | Date: 21-02-2026 News publication date | Time: 03:15 PM News publication time | Views: 56 Number of times this news has been viewed | District: sangli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement