खातिया(जि.गोंदिया)येथे अमृत EDP प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी उद्योजकीय मानसिकता, आत्मविश्वास व व्यवसाय नियोजनावर मार्गदर्शन

खातिया येथे अमृत उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसाचे सत्र उत्साहात पार पडले.

खातिया(जि.गोंदिया)येथे अमृत EDP प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी  उद्योजकीय मानसिकता, आत्मविश्वास व व्यवसाय नियोजनावर मार्गदर्शन मुख्य फोटो
मुख्य फोटो

खातिया, दि. २५ सप्टेंबर : अमृत – महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, जिल्हा कार्यालय गोंदिया यांच्या वतीने आयोजित अमृत उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसाचे सत्र खातिया येथे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले. प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी ग्रामपंचायत खातियाचे सरपंच श्री. ललितजी तावाडे, माजी उपसरपंच श्री. सूरजलालजी खोटेले, प्रशिक्षक श्री. अजयकुमार ठाकुर तसेच वरिष्ठ समाजसेवी श्री. प्रतापजी जरवार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी सहभागी उमेदवारांना उद्योजकीय मानसिकता विकसित करणे, आत्मविश्वास वाढविणे, संघटन कौशल्य, जोखीम स्वीकारण्याची क्षमता आणि उपक्रमशीलता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आपल्या क्षमता व उपलब्ध साधनसामग्रीनुसार योग्य व्यवसायाची निवड, व्यवसाय नियोजन आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आवश्यक कौशल्ये यावरही मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. उद्योजकतेकडे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करून भविष्यात स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्ये विकसित करण्यावर प्रशिक्षणात विशेष भर देण्यात आला. अमृत संस्थेच्या माध्यमातून आयोजित या प्रशिक्षणामुळे सहभागी उमेदवारांना व्यवसायाच्या विविध पैलूंची माहिती मिळण्यास तसेच स्वयंरोजगाराच्या दिशेने वाटचाल करण्यास मार्गदर्शन मिळणार आहे. प्रशिक्षणाचा पुढील प्रवासही उत्साहपूर्ण आणि यशस्वी व्हावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

अमृत – महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी जिल्हा कार्यालय, गोंदिया


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Kartik Tiwari News publisher name | Date: 25-09-2026 News publication date | Time: 12:37 PM News publication time | Views: 17 Number of times this news has been viewed | District: Gondia Related district of the news
Publisher: Kartik Tiwari News publisher name | Date: 25-09-2026 News publication date | Time: 12:37 PM News publication time | Views: 17 Number of times this news has been viewed | District: Gondia Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement