स्वामी विवेकानंदांच्या शिकागो भाषणाचा स्मृतीजागर; देगलूर महाविद्यालयात ‘अमृत युवा ऊर्जा’ कार्यक्रम यशस्वी!'एक दिवस राष्ट्रासाठी': देगलूरच्या महाविद्यालयीन तरुणाईचा 'अमृत युवा ऊर्जा' उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग!
स्वामी विवेकानंदांच्या शिकागो भाषणाचा स्मृतीजागर; देगलूर महाविद्यालयात ‘अमृत युवा ऊर्जा’ कार्यक्रम यशस्वी! 'एक दिवस राष्ट्रासाठी': देगलूरच्या महाविद्यालयीन तरुणाईचा 'अमृत युवा ऊर्जा' उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग! विश्वबंधुत्व पंधरवाड्यानिमित्त देगलूर महाविद्यालयात डॉ. रवींद्र बेंबरे यांचे ओघवते व्याख्यान; ‘अमृत युवा ऊर्जा’द्वारे युवकांशी संवाद! देगलूर: स्वामी विवेकानंद यांच्या ऐतिहासिक शिकागो भाषणाच्या स्मरणार्थ ‘अमृत संस्था’ (शाखा नांदेड) व ‘वै. धुंडा महाराज महाविद्यालय, देगलूर’ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ११ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२६ दरम्यान "विश्वबंधुत्व पंधरवाडा" साजरा केला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत देगलूर येथील वै. धुंडा महाराज महाविद्यालयात विशेष व्याख्यान आणि ‘अमृत युवा ऊर्जा’ संवाद कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय कुलकर्णी होते. तर उपप्राचार्य डॉ. दिलीप भडके, मराठी विषयाचे प्राध्यापक व प्रमुख व्याख्याते डॉ. रवींद्र बेंबरे, डॉ. प्रकाश वारे, अमृत संस्थेचे नांदेड जिल्हा व्यवस्थापक श्री. सौरभ माळहिप्परगेकर, उपव्यवस्थापक श्री. विश्वेश्वर जोशी आणि शासकीय औ. प्रा. संस्था (नायगाव) चे व्यवस्थापन समिती सदस्य श्री. लक्ष्मण बुद्धलवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अमृत संस्थेचे उपव्यवस्थापक श्री. विश्वेश्वर जोशी यांनी प्राचार्य व मुख्य व्याख्यात्यांचा सत्कार केला. त्यांनी संस्थेच्या विविध सामाजिक योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. स्वामीजींचे विचार आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व: पहिल्या सत्रात मुख्य व्याख्याते डॉ. रवींद्र बेंबरे यांनी आपल्या अत्यंत अभ्यासपूर्ण शैलीत स्वामी विवेकानंदांच्या शिकागो येथील ऐतिहासिक भाषणाचे पैलू उलगडून दाखवले. त्यांनी स्वामीजींचा संपूर्ण जीवनपट आणि प्रेरणादायी प्रसंग विद्यार्थ्यांसमोर मांडत भारतीय संस्कृती, महान परंपरा आणि राष्ट्रीय अस्मितेचे महत्त्व पटवून दिले. ‘एक दिवस राष्ट्रासाठी’ -Gen Z युवकांशी संवाद: दुसऱ्या सत्रात अमृत संस्थेच्या ‘एक दिवस राष्ट्रासाठी’ या उपक्रमाअंतर्गत "अमृत युवा ऊर्जा" या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये नांदेडचे जिल्हा व्यवस्थापक श्री. सौरभ माळहिप्परगेकर यांनी महाविद्यालयीन तरुणाईशी (Gen Z) थेट संवाद साधला. या प्रसंगी अनेक युवक-युवतींनी आपल्या भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त केल्या. अध्यक्षीय समारोप व आभार: आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. विजय कुलकर्णी यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन करत, युवकांच्या कल्याणासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली व अमृत संस्थेचे आभार मानले. नांदेड जिल्हा व्यवस्थापकांनी महाविद्यालय प्रशासनाचे आभार मानले. हा संपूर्ण कार्यक्रम महाविद्यालयाचे सचिव आदरणीय श्री. राजेश महाराज देगलूरकर यांच्या विशेष सहकार्यातून व मार्गदर्शनातून अत्यंत उत्साहात पार पडला.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment