परंड्यात ‘अमृत पेठ’ उत्साहात संपन्न; महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना मिळाले व्यासपीठ

धाराशिव : अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) व समर्थ तरुण गणेश मंडळ, परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ‘अमृत पेठ – थेट बाजारपेठ’ मोठ्या उत्साहात संपन्न झाली. महिला बचत गट, गृहउद्योग व महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या एकदिवसीय उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

परंड्यात ‘अमृत पेठ’ उत्साहात संपन्न; महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना मिळाले व्यासपीठ मुख्य फोटो
परंड्यात ‘अमृत पेठ’ उत्साहात संपन्न; महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना मिळाले व्यासपीठ अतिरिक्त फोटो

धाराशिव : अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) व समर्थ तरुण गणेश मंडळ, परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ‘अमृत पेठ – थेट बाजारपेठ’ मोठ्या उत्साहात संपन्न झाली. महिला बचत गट, गृहउद्योग व महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या एकदिवसीय उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अमृत पेठेमध्ये एकूण १० स्टॉल्स सहभागी झाले होते. हस्तकला, गृहउद्योग उत्पादने, खाद्यपदार्थ, वस्त्रप्रकार, दागिने व विविध स्थानिक उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली. महिला उद्योजिकांना आपली उत्पादने सादर करण्यासाठी व विक्रीसाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाल्याने सहभागी महिलांनी समाधान व्यक्त केले. या प्रसंगी युवा नेते विश्वजीत पाटील, विकास कुलकर्णी, राजकुमार पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन स्टॉलधारकांना प्रोत्साहन दिले. उपस्थित मान्यवरांनी महिला सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित करत आयोजकांचे कौतुक केले. अमृत मित्र रवी वैद्य यांच्या नियोजनातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाच्या नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत त्यांनी विशेष मेहनत घेतल्याने अमृत पेठेला यश मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Publisher: Chinmay Kulkarni News publisher name | Date: 24-09-2026 News publication date | Time: 06:15 PM News publication time | Views: 25 Number of times this news has been viewed | District: Dharashiv Related district of the news
Publisher: Chinmay Kulkarni News publisher name | Date: 24-09-2026 News publication date | Time: 06:15 PM News publication time | Views: 25 Number of times this news has been viewed | District: Dharashiv Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement