कारंजादत्त येथे अमृत संस्थेच्या आयात-निर्यात प्रशिक्षणवर्गाचे उद्घाटन
कारंजादत्त (जि. वाशिम) : 'ग्रामीण भागातील युवकांनी आयात-निर्यात क्षेत्राकडे व्यवसायाच्या दृष्टीने पाहावे. योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळाल्यास जागतिक बाजारपेठेत स्थान निर्माण करणे शक्य आहे,' असे प्रतिपादन अमृत संस्थेचे अमरावती विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर यांनी केले. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्याअंतर्गत कारंजादत्त येथे आयोजित करण्यात आलेल्या आयात-निर्यात प्रशिक्षणवर्गाचे उद्घाटन कोळेश्वर यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून २४ फेब्रुवारीला झाले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी आयात-निर्यात क्षेत्रातील वाढत्या संधी, जागतिक बाजारपेठेतील स्पर्धा आणि ग्रामीण युवकांसाठी उपलब्ध होणाऱ्या रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना आंतरराष्ट्रीय व्यापार प्रक्रिया, कागदपत्रांची पूर्तता, निर्यात धोरणे, शासकीय योजना व अनुदाने यांची सविस्तर माहिती या उपक्रमात दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. प्रवीण कोळेश्वर यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला स्थानिक अधिकारी, प्रशिक्षक, प्रशिक्षणार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे कारंजादत्त परिसरातील युवकांना नवीन व्यावसायिक संधी उपलब्ध होणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला अमृत संस्थेचे वाशिम जिल्हा व्यवस्थापक योगेश जोशी, उपव्यवस्थापक रोहित देशमुख, अमृतमित्र नंदकिशोर वनसकर आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे अधिकारी गौरव इंगळे उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी संपर्क :
योगेश जोशी - 9112227634
वाशिम जिल्हा व्यवस्थापक, अमृत
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment