कार्यकर्तृत्वाचे स्मरण करून आदरांजली
नाशिक : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या नाशिक विभागीय कार्यालयात क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना स्मृतिदिनानिमित्त वंदन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. एक प्रखर राष्ट्रभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी अमृत संस्थेचे नाशिक विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर, जिल्हा व्यवस्थापक संजय गोसावी, तसेच अमृतसखी हर्षाली पुराणिक आणि अमृतमित्र मयूर हातवळणे उपस्थित होते.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment