सिल्लोडमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना अमृत संस्थेतर्फे अभिवादन - अमृत महाराष्ट्र

सिल्लोडमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना अमृत संस्थेतर्फे अभिवादन

विशेष कार्यक्रमाचे आयोजन

सिल्लोडमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना अमृत संस्थेतर्फे अभिवादन मुख्य फोटो
सिल्लोडमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना अमृत संस्थेतर्फे अभिवादन अतिरिक्त फोटो

सिल्लोड : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे सिल्लोडमधील शिक्षक कॉलनीतील राज कम्प्युटर येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अमृत संस्थेचे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी सावरकरांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या राष्ट्रभक्तीच्या विचारांना उजाळा दिला. कार्यक्रमाला राज कम्प्युटरचे संचालक सचिन उपळीकर, बुलढाणा अर्बन बँकेचे शाखा व्यवस्थापक गजानन झाल्टे, अमित कुलकर्णी, प्रसन्न कुलकर्णी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या वेळी सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, त्यांचे राष्ट्रनिष्ठ विचार आणि समाजप्रबोधनाचे कार्य या विषयांबद्दल उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले.

या वेळी बुलढाणा अर्बन बँकेचे शाखा व्यवस्थापक गजानन झाल्टे यांनी सांगितले, 'अमृत संस्थेचे कार्य खरोखरच उल्लेखनीय आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत असताना अमृत संस्थेकडून थोर विचारवंत पुरुषांचे स्मरण करून त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य सातत्याने केले जात आहे. यामुळे समाजाला सकारात्मक संदेश दिला जात आहे.'

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: योगेश रोडे News publisher name | Date: 27-02-2026 News publication date | Time: 12:09 AM News publication time | Views: 65 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news
Publisher: योगेश रोडे News publisher name | Date: 27-02-2026 News publication date | Time: 12:09 AM News publication time | Views: 65 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement