अहिल्यानगरमध्ये बाँड ग्रुपच्या कार्यक्रमातून 'अमृत'च्या योजनांविषयी जनजागृती - अमृत महाराष्ट्र

अहिल्यानगरमध्ये बाँड ग्रुपच्या कार्यक्रमातून 'अमृत'च्या योजनांविषयी जनजागृती

विशेष बैठकीचे आयोजन

अहिल्यानगरमध्ये बाँड ग्रुपच्या कार्यक्रमातून 'अमृत'च्या योजनांविषयी जनजागृती मुख्य फोटो
अहिल्यानगरमध्ये बाँड ग्रुपच्या कार्यक्रमातून 'अमृत'च्या योजनांविषयी जनजागृती अतिरिक्त फोटो

अहिल्यानगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. त्या संस्थेच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी बाँड ग्रुपतर्फे अहिल्यानगरमधील स्वाद मराठी हॉटेलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी लक्ष्यित गटातील व्यावसायिकांना अमृत संस्थेच्या योजनांची सविस्तर माहिती दिली. कर्ज व्याजपरतावा योजना, अमृतपेठ, अमृतपेठ थेट बाजारपेठ, अमृत महाराष्ट्र, अमृत कौशल्य उद्यम प्रशिक्षण योजना, तसेच इतर सर्व योजनांची सविस्तर माहिती या वेळी देण्यात आली. योजनांचा लाभ अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी सहकार्याचे आश्वासन दिले. बाँड ग्रुपचे श्रीपाद फाटक, प्रफुल्ल नातू, मुकेश साठ्ये, नचिकेत रसाळ, सचिन फाटक, प्रतीक जोशी यांच्या सहकार्यातून ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी लक्ष्यित गटातील अनेक व्यावसायिक महिलाही उपस्थित होत्या.

अधिक माहितीसाठी संपर्क :

सागर भोपे : 9766622274

अमृत कार्यालय : 9112228769

पत्ता : अमृत कार्यालय, आकाशवाणी केंद्रासमोर, प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 28-02-2026 News publication date | Time: 03:27 PM News publication time | Views: 131 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 28-02-2026 News publication date | Time: 03:27 PM News publication time | Views: 131 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement