फोटोशॉप आणि ग्राफिक्स डिझायनिंग प्रशिक्षणामुळे झाली स्वयंरोजगारासाठी सिद्धता - अमृत महाराष्ट्र

फोटोशॉप आणि ग्राफिक्स डिझायनिंग प्रशिक्षणामुळे झाली स्वयंरोजगारासाठी सिद्धता

तिवसा येथे अमृत संस्थेतर्फे आयोजित प्रशिक्षण घेतल्यानंतर लाभार्थ्यांची भावना

फोटोशॉप आणि ग्राफिक्स डिझायनिंग प्रशिक्षणामुळे झाली स्वयंरोजगारासाठी सिद्धता मुख्य फोटो
फोटोशॉप आणि ग्राफिक्स डिझायनिंग प्रशिक्षणामुळे झाली स्वयंरोजगारासाठी सिद्धता अतिरिक्त फोटो

अमरावती : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अर्थात एमसीईडी यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे फोटोशॉप अँड ग्राफिक्स डिझायनिंग प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाचा नुकताच समारोप झाला.

अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर, एमसीईडी ऑर्गनायझर स्वप्नील इसळ, तसेच प्रशिक्षक सूरज देवतारे या वेळी उपस्थित होते. या वेळी प्रशिक्षणार्थ्यांनी आपले अनुभव सांगितले आणि या प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाबद्दल समाधान व्यक्त केले.

केदार गोगरकर यांनी प्रशिक्षणार्थ्यांना लवकरात लवकर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन केले. तसेच या प्रेरणादायी उपक्रमात अधिकाधिक लोकांना सहभागी करून घेण्यावर भर देऊन, कौशल्यविकासातून स्वावलंबन साधण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

या कार्यक्रमामुळे अमरावती जिल्ह्यातील युवक-युवतींना कौशल्याच्या माध्यमातून रोजगार व उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. स्वयंरोजगारासाठी सिद्ध केल्याबद्दल सर्व लाभार्थ्यांनी अमृत संस्थेचे आभार मानले आहेत.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/



Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 26-03-2026 News publication date | Time: 01:46 PM News publication time | Views: 37 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 26-03-2026 News publication date | Time: 01:46 PM News publication time | Views: 37 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement