साताऱ्यात चार-पाच एप्रिलला भरणार अमृतपेठ थेट बाजारपेठ - अमृत महाराष्ट्र

साताऱ्यात चार-पाच एप्रिलला भरणार अमृतपेठ थेट बाजारपेठ

स्थानिक उद्योजकांना नवे व्यासपीठ; ग्राहकांना दर्जेदार स्वदेशी उत्पादने थेट उत्पादकांकडून खरेदी करण्याची संधी

साताऱ्यात चार-पाच एप्रिलला भरणार अमृतपेठ थेट बाजारपेठ मुख्य फोटो
साताऱ्यात चार-पाच एप्रिलला भरणार अमृतपेठ थेट बाजारपेठ अतिरिक्त फोटो

सातारा : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे अमृतपेठ थेट बाजारपेठ हा उपक्रम राबवला जातो. स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच ग्राहकांना थेट उत्पादकांकडून दर्जेदार वस्तूंच्या खरेदीची संधी उपलब्ध करून देण्यासाठीचा हा उपक्रम चार आणि पाच एप्रिल रोजी साताऱ्यात होणार आहे.

या उपक्रमातून स्थानिक लघुउद्योजकांच्या म्हणजेच स्वदेशी उत्पादनांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात येत आहे. या प्रदर्शनामध्ये विविध लघुउद्योजक, बचत गट आणि स्थानिक उत्पादक सहभागी होणार असून, त्यांच्या विविध दर्जेदार उत्पादनांची थेट ग्राहकांना विक्री केली जाणार आहे. नागरिकांना स्थानिक उत्पादकांची दर्जेदार स्वदेशी उत्पादने थेट ग्राहकांकडून खरेदी करण्याची उत्तम संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. सातारा व परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देऊन उत्पादकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दिनांक : ४ आणि ५ एप्रिल २०२६. सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत

स्थळ : महिला मंडळ हॉल, राजवाडा, सातारा

स्टॉल बुकिंग आणि अधिक माहितीसाठी संपर्क : 9112227638

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: विनायक पाठकजी News publisher name | Date: 28-03-2026 News publication date | Time: 04:01 PM News publication time | Views: 20 Number of times this news has been viewed | District: satara Related district of the news
Publisher: विनायक पाठकजी News publisher name | Date: 28-03-2026 News publication date | Time: 04:01 PM News publication time | Views: 20 Number of times this news has been viewed | District: satara Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement