यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे २९ मार्चला भरणार अमृतपेठ थेट बाजारपेठ - अमृत महाराष्ट्र

यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे २९ मार्चला भरणार अमृतपेठ थेट बाजारपेठ

ग्राहकांना उपलब्ध होणार दर्जेदार स्थानिक उत्पादने आणि लघुउद्योजकांना मिळणार बाजारपेठ

यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे २९ मार्चला भरणार अमृतपेठ थेट बाजारपेठ मुख्य फोटो
यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे २९ मार्चला भरणार अमृतपेठ थेट बाजारपेठ अतिरिक्त फोटो

यवतमाळ : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य करत आहे. अमृतपेठ - थेट बाजारपेठ हा उपक्रमही त्यापैकीच एक असून, यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे २९ मार्च रोजी त्याचे आयोजन करण्यात आले आहे.

वणीतील जेताई मंदिर सभागृहात अमृतपेठ प्रदर्शनाच्या माध्यमातून स्थानिक व्यापारी, उद्योजक व स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे. या प्रदर्शनामध्ये विविध पारंपरिक, स्वदेशी व स्थानिक, तसेच दर्जेदार उत्पादने ग्राहकांना खरेदी करता येतील. या उपक्रमामुळे परंपरेचा वारसा, स्वदेशीचा अभिमान जपला जाणार असून, स्थानिक व्यापाराला नवा उत्साह मिळण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : ९११२२२७६३३, ८०८७२४८६७४

पत्ता : अमृत जिल्हा कार्यालय

स्वामी समर्थ विहार, पहिला माळा, 

फ्लॅट क्रमांक ए-१, 

अवधूतवाडी, तिवारी चौक, 

यवतमाळ - ४४५ ००१  

ई-मेल : amrut.yavatmal.dm@gmail.com 


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 27-03-2026 News publication date | Time: 03:52 PM News publication time | Views: 28 Number of times this news has been viewed | District: yavatmal Related district of the news
Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 27-03-2026 News publication date | Time: 03:52 PM News publication time | Views: 28 Number of times this news has been viewed | District: yavatmal Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement