विश्व मराठी संमेलनातील अमृत संस्थेच्या दालनाला आवर्जून दिली भेट
नाशिक : येथे भरलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या योजनांची माहिती देणारे खास दालन आहे. विविध दृकश्राव्य माध्यमांतील पत्रकारितेचा अनुभव असलेले आणि सध्या व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून कार्यरत असलेले प्रसिद्ध पत्रकार भूषण करंदीकर यांनी अमृत संस्थेच्या दालनाला भेट दिली. या वेळी त्यांनी अमृत संस्थेतर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध योजना, संस्थेची कार्यपद्धती आणि कार्यक्षेत्र यांविषयी माहिती घेतली. संस्थेचाया कार्याचे त्यांनी कौतुक केले आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment