छत्रपती संभाजीनगरमध्ये अमृत संस्थेच्या योजनांबद्दल जनजागृती - अमृत महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमध्ये अमृत संस्थेच्या योजनांबद्दल जनजागृती

विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्थेसह अमृत संस्थेचा विशेष कार्यक्रम

छत्रपती संभाजीनगरमध्ये अमृत संस्थेच्या योजनांबद्दल जनजागृती मुख्य फोटो
छत्रपती संभाजीनगरमध्ये अमृत संस्थेच्या योजनांबद्दल जनजागृती अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्था आणि महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या संयुक्त विद्यमाने नागेश्वरवाडी येथील स्वामी रामानंद तीर्थ सभागृहात अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती देणारी सभा उत्साहात पार पडली. या सभेत संस्थेतर्फे लक्ष्यित गटासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून अमृत संस्थेचे नाशिक विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर उपस्थित होते. त्यांनी उपस्थित असलेले नागरिक व विद्यार्थ्यांना ड्रोन प्रशिक्षण, अमृत बेकरी, सोलार इन्स्टॉलेशन टेक्निशियन – अमृत सूर्यमित्र, अमृत आयात-निर्यात, अमृतपेठ, अमृत आरीवर्क, अमृत ग्लॅमर (ब्युटी पार्लर), तसेच अमृत उद्यम कौशल्य प्रशिक्षण (ईडीपी) आदी योजनांविषयी सखोल मार्गदर्शन केले. या योजनांमुळे युवक-युवतींना कौशल्यविकासासोबत स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून, आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग खुला होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष सुरेश देशपांडे यांनी मंगेश खाडिलकर यांचा सत्कार करून स्वागत केले. या वेळी प्रोफेशनल ट्रेनर आणि बीसीएसपीएल संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक, तसेच फोर सी संस्थेचे संस्थापक सुमित उदयगिरी, संस्थेचे उपाध्यक्ष आदित्य धाराशिवकर, सहसचिव दत्तात्रय देशपांडे, सदाशिव पोहंडुळकर, राजशेखर बालेकर, ए. जी. कुलकर्णी, विलास बावस्कर, अनिल देशमुख, धनंजय पांडे यांच्यासह तसेच नागरिक, विद्यार्थी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 01-03-2026 News publication date | Time: 10:07 PM News publication time | Views: 78 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 01-03-2026 News publication date | Time: 10:07 PM News publication time | Views: 78 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement