अहिल्यानगरमधील अमृतपेठ प्रदर्शनाला महापौर ज्योती गाडे आवर्जून उपस्थित राहणार - अमृत महाराष्ट्र

अहिल्यानगरमधील अमृतपेठ प्रदर्शनाला महापौर ज्योती गाडे आवर्जून उपस्थित राहणार

अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी यांच्या हस्ते देण्यात आले निमंत्रण

अहिल्यानगरमधील अमृतपेठ प्रदर्शनाला महापौर ज्योती गाडे आवर्जून उपस्थित राहणार मुख्य फोटो
मुख्य फोटो

अहिल्यानगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी यांनी अमृत संस्थेच्या अहिल्यानगर कार्यालयाला भेट दिली. अमृत संस्थेच्या जिल्ह्यातील कार्याचा त्यांनी आढावा घेतला. या वेळी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले. या वेळी अमृतसखी गौरी कुलकर्णी उपस्थित होती.

अमृतपेठ प्रदर्शन अहिल्यानगरमध्ये भरणार असून, १४ मार्च रोजी त्याचे उद्घाटन होणार आहे. दीपक जोशी यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर सौ. ज्योती अमोल गाडे यांना त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. 

अधिक माहितीसाठी संपर्क :

सागर भोपे : 9766622274

अमृत कार्यालय : 9112228769

पत्ता : अमृत कार्यालय, आकाशवाणी केंद्रासमोर, प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 02-03-2026 News publication date | Time: 06:57 PM News publication time | Views: 87 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement