खोपोलीमध्ये सहा ते आठ मार्च या कालावधीत अमृतपेठ थेट स्वदेशी बाजारपेठ - अमृत महाराष्ट्र

खोपोलीमध्ये सहा ते आठ मार्च या कालावधीत अमृतपेठ थेट स्वदेशी बाजारपेठ

रोजगारनिर्मिती, उद्योजकता विकास आणि आर्थिक स्वावलंबनाचा सेतू; ग्राहकांना करता येणार दर्जेदार वस्तूंची खरेदी

खोपोलीमध्ये सहा ते आठ मार्च या कालावधीत अमृतपेठ थेट स्वदेशी बाजारपेठ मुख्य फोटो
खोपोलीमध्ये सहा ते आठ मार्च या कालावधीत अमृतपेठ थेट स्वदेशी बाजारपेठ अतिरिक्त फोटो

खोपोली (रायगड) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले जातात. अमृतपेठ थेट स्वदेशी बाजारपेठ हा त्यापैकीच एक महत्त्वाकांक्षी उपक्रम असून, त्याअंतर्गत खोपोलीतील लोहाना समाज हॉलमध्ये सहा ते आठ मार्च २०२६ या कालावधीत अमृतपेठ प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. 

या बाजारपेठेमुळे स्थानिक लघुउद्योजक, महिला बचतगट, स्वयंरोजगार करणारे युवक-युवती, कारागीर व उत्पादक यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी, स्वतःची उत्पादने विक्रीस ठेवण्याचे व्यासपीठ आणि स्वदेशी उद्योगांना चालना मिळणार आहे. हा उपक्रम युवा उद्योजक संजय तन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, स्थानिक उद्योजक व व्यवसायिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्थानिक उद्योजक आणि नवा उद्योग सुरू करण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच ग्राहकांनीही दर्जेदार उत्पादनांची खरेदी येथे करून हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

शैलेश मराठे - ९११२२२८७५९

रायगड जिल्हा व्यवस्थापक, अमृत

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 05-03-2026 News publication date | Time: 12:03 AM News publication time | Views: 46 Number of times this news has been viewed | District: raigad Related district of the news
Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 05-03-2026 News publication date | Time: 12:03 AM News publication time | Views: 46 Number of times this news has been viewed | District: raigad Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement