स्थानिक उद्योजकांना व्यासपीठ देणाऱ्या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी मंत्री अतुल सावे यांना निमंत्रण
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत छत्रपती संभाजीनगरमध्ये १४ आणि १५ मार्च २०२६ रोजी 'अमृतपेठ - थेट बाजारपेठ' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी इतर मागास बहुजन कल्याण, अपारंपरिक ऊर्जा, दुग्धविकास आणि दिव्यांगकल्याण मंत्री अतुल सावे यांना निमंत्रण देण्यात आले. अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी सावे यांची भेट घेऊन हे निमंत्रण दिले. तसेच कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. सावे यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
अमृत संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना, तसेच स्थानिक लघुउद्योजकांना त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे लघुउद्योजकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे.
अमृतपेठ - थेट बाजारपेठ
स्थळ : शिवम मंगल कार्यालय, बीड बायपास, छत्रपती नगर
दिवस : १४, १५ मार्च २०२६
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment