अमृत संस्थेतर्फे करण्यात आले कौतुक आणि अभिनंदन
यवतमाळ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त यवतमाळमधील विवेकानंद विद्यालयात विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक दुर्गांच्या आकर्षक प्रतिकृती साकारून शिवकालीन दुर्गसंस्कृतीला उजाळा दिला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता आणि इतिहासाबद्दलची जिज्ञासा दाखवून शिवकालीन किल्ल्यांचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.
विद्यार्थ्यांनी किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करताना त्यांची रचना, संरक्षण व्यवस्था आणि ऐतिहासिक वैशिष्ट्ये यांचा अभ्यास करून मांडणी केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना इतिहासाचे ज्ञान मिळण्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यस्थापनेतील दुर्गांचे महत्त्व समजण्यास मदत झाली.
या उपक्रमाला अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक परीक्षित शर्मा यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गड-किल्ल्यांच्या प्रतिकृतींची पाहणी केली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे विशेष कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक विवेक अलोणी यांचेही अभिनंदन करून वेगळ्या अशा उपक्रमाचे कौतुक केले.
या उपक्रमात दीप येडे, श्रीजित इंगोले, अर्शद शेंडे, ओम कोरवते, अर्णव ठाकरे, आदर्श लंगोटे, अर्णव माडसे या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन दुर्गांच्या आकर्षक प्रतिकृती साकारल्या. शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला शिक्षक प्रफुल्ल गावंडे, पालक व नागरिकांचे उत्स्फूर्त पाठबळ लाभले. विद्यालयाच्या वतीने अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची आवड आणि राष्ट्राभिमान वाढवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९११२२२७६३३
पत्ता : अमृत जिल्हा कार्यालय
स्वामी समर्थ विहार, पहिला माळा,
फ्लॅट क्रमांक ए-१,
अवधूतवाडी, तिवारी चौक,
यवतमाळ - ४४५ ००१
ई-मेल : amrut.yavatmal.dm@gmail.com
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment