महिला दिनानिमित्त 'अमृत'च्या अहिल्यानगर कार्यालयात विशेष उपक्रम - अमृत महाराष्ट्र

महिला दिनानिमित्त 'अमृत'च्या अहिल्यानगर कार्यालयात विशेष उपक्रम

संस्थेच्या लक्ष्यित गटातील महिलांचा करण्यात आला सन्मान

महिला दिनानिमित्त 'अमृत'च्या अहिल्यानगर कार्यालयात विशेष उपक्रम मुख्य फोटो
महिला दिनानिमित्त 'अमृत'च्या अहिल्यानगर कार्यालयात विशेष उपक्रम अतिरिक्त फोटो

अहिल्यानगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत संस्थेच्या अहिल्यानगर येथील जिल्हा कार्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेष उपक्रमाने साजरा करण्यात आला. जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी संस्थेच्या लक्ष्यित गटातील महिलांना तुळशीचे रोप देऊन सन्मानित केले.

कार्यक्रमाची सुरुवात भारतमातापूजनाने झाली. अमृतसखी गौरी कुलकर्णीने उपस्थित सर्व महिलांना शुभेच्छा देऊन व्यक्तिमत्त्व विकासाविषयी मार्गदर्शन केले. अमृत संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या अमृतपेठ - थेट बाजारपेठ या उपक्रमाबाबतही महिलांना महत्त्वाची माहिती देण्यात आली. सागर भोपे यांनी अमृत संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. ती लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन उपस्थित महिलांनी दिले. या वेळी सौ. गीता गिलडा, सौ. छाया राजपूत, सौ. रेणुका करंदीकर, सौ. स्नेहल धर्माधिकरी, सौ. अर्चना पळुस्कर, सौ. स्मिता साठ्ये यांच्यासह अशोक बकोरे व सुनील कात्रे उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी संपर्क :

अमृत कार्यालय : 9112228769

पत्ता : अमृत कार्यालय, आकाशवाणी केंद्रासमोर, प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 09-03-2026 News publication date | Time: 05:59 PM News publication time | Views: 193 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 09-03-2026 News publication date | Time: 05:59 PM News publication time | Views: 193 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement