अमृत संस्थेच्या परभणी जिल्हा कार्यालयात महिला दिन उत्साहात साजरा - अमृत महाराष्ट्र

अमृत संस्थेच्या परभणी जिल्हा कार्यालयात महिला दिन उत्साहात साजरा

नेतृत्वगुण आणि उद्योजकतेबद्दल मार्गदर्शन

अमृत संस्थेच्या परभणी जिल्हा कार्यालयात महिला दिन उत्साहात साजरा मुख्य फोटो
अमृत संस्थेच्या परभणी जिल्हा कार्यालयात महिला दिन उत्साहात साजरा अतिरिक्त फोटो

परभणी : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत संस्थेच्या परभणी कार्यालयात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महिलांच्या सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी उद्योग, व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रात पुढे यावे, याकरिता प्रेरक विचार मांडण्यात आले.

या कार्यक्रमाला रेणुका कुलकर्णी, मीनाक्षी दडके आणि प्राची वैद्य उपस्थित होत्या. त्यांनी महिलांना आत्मविश्वास, स्वावलंबन आणि नेतृत्वगुणांवर मार्गदर्शन केले. महिलांनी आपल्या कौशल्यांचा वापर करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे त्यांनी सांगितले. 

कार्यक्रमाला अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे, तसेच अमृतसखी मयुरी टेळकीकर उपस्थित होत्या. या वेळी उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. उद्योग-व्यवसायाच्या वाढीसाठी अमृतपेठ थेट बाजारपेठ याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. अमृतपेठ थेट बाजारपेठ या उपक्रमाला मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 10-03-2026 News publication date | Time: 12:18 PM News publication time | Views: 92 Number of times this news has been viewed | District: parbhani Related district of the news
Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 10-03-2026 News publication date | Time: 12:18 PM News publication time | Views: 92 Number of times this news has been viewed | District: parbhani Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement