अमृत संस्थेच्या पुणे मुख्यालयात पार पडले अमृतमित्रांचे प्रशिक्षण - अमृत महाराष्ट्र

अमृत संस्थेच्या पुणे मुख्यालयात पार पडले अमृतमित्रांचे प्रशिक्षण

नागपूर विभागातील अमृतमित्रांनी जाणून घेतली संस्थेची कार्यपद्धती

अमृत संस्थेच्या पुणे मुख्यालयात पार पडले अमृतमित्रांचे प्रशिक्षण मुख्य फोटो
अमृत संस्थेच्या पुणे मुख्यालयात पार पडले अमृतमित्रांचे प्रशिक्षण अतिरिक्त फोटो

पुणे : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या पुणे येथील मुख्यालयात अमृतमित्रांसाठी विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये नागपूर विभागातील विविध जिल्ह्यांमधील अमृतमित्रांनी सहभाग घेतला.

अमृत संस्थेची उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि विविध उपक्रमांची सखोल माहिती अमृतमित्रांपर्यंत पोहोचवणे हा या प्रशिक्षण सत्राचा उद्देश होता. अमृत संस्था नेमकी कोणासाठी कार्य करते, तिच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील वंचित घटकांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी कोणत्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात, याबाबत या वेळी सविस्तर माहिती देण्यात आली.

अमृत संस्थेच्या कार्याची पार्श्वभूमी, उद्दिष्टे, तसेच उद्योजकता विकास, स्वयंरोजगार निर्मिती, कौशल्यविकास आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहितीही या वेळी देण्यात आली. अमृतमित्रांनी जिल्हा व तालुका स्तरावर काम करताना लाभार्थ्यांपर्यंत योजना कोणत्या पद्धतीने पोहोचवाव्यात, त्यांना मार्गदर्शन कसे करावे आणि स्थानिक पातळीवर उद्योजकता कशी विकसित करावी, या संदर्भातही मार्गदर्शन करण्यात आले.

अमृत संस्थेअंतर्गत राबवण्यात येणारे विविध उपक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम, प्रदर्शन उपक्रम, उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या पुढाकारांविषयीही माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणामुळे अमृतमित्रांना कार्याची दिशा अधिक स्पष्ट झाली असून, जिल्हा स्तरावर योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

नागपूर विभागातून या प्रशिक्षणासाठी रवींद्र श्रीराम श्रौती, निखिल संजय देशपांडे, श्रीरंग खोंड, सतीश नारायणदास, धीरज राठी, पीयूष पुरोहित, वेदान्त मेहता आणि हेमंत चंदावसकर हे अमृतमित्र उपस्थित होते. त्यांनी प्रशिक्षण कालावधीत विविध विषयांवर चर्चा करून योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आपले अनुभव आणि सूचनादेखील मांडल्या.

या प्रशिक्षणामुळे अमृतमित्रांना संस्थेच्या योजनांबाबत सखोल माहिती मिळाली असून, आगामी काळात नागपूर विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 10-03-2026 News publication date | Time: 01:45 PM News publication time | Views: 119 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news
Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 10-03-2026 News publication date | Time: 01:45 PM News publication time | Views: 119 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement