'अमृत'च्या भंडारा कार्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा - अमृत महाराष्ट्र

'अमृत'च्या भंडारा कार्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

विशेष कार्यक्रमाचे आयोजन

'अमृत'च्या भंडारा कार्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा मुख्य फोटो
'अमृत'च्या भंडारा कार्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा अतिरिक्त फोटो

भंडारा : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या भंडारा जिल्हा कार्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेष उपक्रमाने साजरा करण्यात आला.

ब्युटी पार्लर प्रशिक्षक सौ. कल्पना हर्देनिया यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. 'मातृभूमी गान से' हे प्रेरक गीत या वेळी सादर करण्यात आले. अमृतसखी साक्षी जोशी यांनी उपस्थित सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. अमृत संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या 'अमृतपेठ - थेट बाजारपेठ' या उपक्रमाबाबत महिलांना महत्त्वाची माहिती देण्यात आली. 

या वेळी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक ओमकार मिलिंदराव हरदास यांनी आपल्या विशेष भाषणात 'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी' या प्रसिद्ध वचनाचा उल्लेख करून मातृभूमिप्रति असलेला आदर आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. आई आणि जन्मभूमी या स्वर्गापेक्षाही अधिक महान आणि श्रेष्ठ आहेत, असे सांगून त्यांनी मातृभूमीबद्दल प्रेम आणि अभिमान बाळगणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे नमूद केले. जशी आई आपल्याला जन्म देते आणि संगोपन करते, तशीच जन्मभूमी आपल्याला ओळख, संस्कृती आणि जगण्याची संधी देते. त्यामुळे आई आणि मातृभूमी या दोन्हींचे स्थान आपल्या जीवनात अत्यंत उच्च असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले. अमृत संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या विविध योजना आणि उपक्रमांची सविस्तर माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली. 

या वेळी सौ. मधू हर्देनिया, सौ. निधी दीक्षित, सौ. अंकिता तिवारी, सौ. सृष्टी शर्मा, सौ. अर्चना मिश्रा, सौ. वसुधा अनवेकर आदी अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील महिला उपस्थित होत्या. मिळालेली माहिती लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन उपस्थित महिलांनी दिले.  

अधिक माहितीसाठी संपर्क :

अमृत कार्यालय : 9112228775, 8857934732, 9325173445, 8605984358. 

पत्ता : अमृत कार्यालय, श्री साई किराणा घराच्या बाजूला, 

शास्त्री नगर, स्टेशन रोड, भंडारा.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Omkar Hardas News publisher name | Date: 10-03-2026 News publication date | Time: 02:24 PM News publication time | Views: 43 Number of times this news has been viewed | District: bhandara Related district of the news
Publisher: Omkar Hardas News publisher name | Date: 10-03-2026 News publication date | Time: 02:24 PM News publication time | Views: 43 Number of times this news has been viewed | District: bhandara Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

h
hemant chandwaskar
12-03-2026 05:02 AM

// गुढीपाडव्याच्या शुभेछ्या//
दि.२०शुक्रवार/21 /22 मार्च २०२६ राजस्थानी भवन जलाराम चौक स्टेशन रोड भंडारा येथे अमृत भंडारा अमृतपेठ थेट बाजारपेठ या योजनेअंतर्गत प्रदर्शनी व आनंद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्वांनी अधिक माहिती करता ओंकार हरदास साक्षी जोशी आणि हेमंत चंदवासकर यांच्याशी संपर्क करावा ९३२५१७३४४५.

Write a Comment
0 / 50 words
Advertisement