सी-डॅकमध्ये प्रशिक्षण घेताय? अमृत संस्थेकडून मिळेल अर्थसाह्य; त्वरेने करा अर्ज - अमृत महाराष्ट्र

सी-डॅकमध्ये प्रशिक्षण घेताय? अमृत संस्थेकडून मिळेल अर्थसाह्य; त्वरेने करा अर्ज

३१ मार्चपर्यंत मुदत; लक्ष्यित गटातील उमेदवारांना सुवर्णसंधी

सी-डॅकमध्ये प्रशिक्षण घेताय? अमृत संस्थेकडून मिळेल अर्थसाह्य; त्वरेने करा अर्ज मुख्य फोटो
सी-डॅकमध्ये प्रशिक्षण घेताय? अमृत संस्थेकडून मिळेल अर्थसाह्य; त्वरेने करा अर्ज अतिरिक्त फोटो

बीड : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. त्यात विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांचाही समावेश आहे. केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सी-डॅक या नामांकित प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती देण्याची योजना राबवली जात आहे. जानेवारी-फेब्रुवारी २०२६च्या बॅचमध्ये प्रवेश घेतलेल्या उमेदवारांसाठी ही योजना लागू असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत.

या योजनेअंतर्गत सी-डॅकच्या विविध आयटी प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी शुल्क प्रतिपूर्ती दिली जाणार आहे. प्रत्येक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांची कमाल संख्या २० इतकी निश्चित करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून, अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ ही आहे. https://mahaamrut.org.in या अमृत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करायचे आहेत.

ऑनलाइन अर्ज करताना खालील कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.

- आधार कार्ड

- पॅन कार्ड

- अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)

- अमृत लक्ष्यित गटातील जातीचा उल्लेख असलेला शासकीय पुरावा (T.C./L.C.)

- कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र किंवा ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र

- सी-डॅक या प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतल्याची पावती

पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या बीड जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन अमृत संस्थेचे बीड जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 73910 65468

पत्ता : अमृत संस्थेचे बीड जिल्हा कार्यालय,

अथर्व कॉम्प्लेक्स, नवगण कॉलेज रोड, 

वाघ नेत्रालयाशेजारी, बीड

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 11-03-2026 News publication date | Time: 11:11 AM News publication time | Views: 131 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news
Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 11-03-2026 News publication date | Time: 11:11 AM News publication time | Views: 131 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement