दारव्हा येथे लवकरच सुरू होणार अमृत ड्रेस डिझायनिंग प्रशिक्षण कार्यक्रम - अमृत महाराष्ट्र

दारव्हा येथे लवकरच सुरू होणार अमृत ड्रेस डिझायनिंग प्रशिक्षण कार्यक्रम

विशेष बैठकीत महिलांना देण्यात आली माहिती

दारव्हा येथे लवकरच सुरू होणार अमृत ड्रेस डिझायनिंग प्रशिक्षण कार्यक्रम मुख्य फोटो
दारव्हा येथे लवकरच सुरू होणार अमृत ड्रेस डिझायनिंग प्रशिक्षण कार्यक्रम अतिरिक्त फोटो

दारव्हा (यवतमाळ) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षण योजनेअंतर्गत ड्रेस डिझायनिंग प्रशिक्षणाबाबत माहिती देण्यासाठी दारव्हा येथे महिलांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला स्थानिक महिला उपस्थित होत्या.

या बैठकीला अमृत संस्थेचे यवतमाळ जिल्हा व्यवस्थापक परीक्षित शर्मा, तसेच जिल्हा उपव्यवस्थापक कामेश राखे उपस्थित होते. या वेळी उपस्थित महिलांना अमृत उद्योग कौशल्यवर्धन योजनेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. परीक्षित शर्मा यांनी सांगितले, की या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना ड्रेस डिझायनिंगचे कौशल्य आत्मसात करून स्वावलंबी होण्याची संधी मिळणार आहे. तसेच स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्यासाठीही हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ येत्या काही दिवसांत दारव्हा येथे करण्यात येणार असून, जास्तीत जास्त महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या बैठकीत प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत प्राथमिक माहिती देण्यात आली. तसेच महिलांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 10-03-2026 News publication date | Time: 11:30 AM News publication time | Views: 44 Number of times this news has been viewed | District: yavatmal Related district of the news
Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 10-03-2026 News publication date | Time: 11:30 AM News publication time | Views: 44 Number of times this news has been viewed | District: yavatmal Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement