लातूरमधील उद्योजक मेळाव्यात अमृत संस्थेच्या योजनांचा जागर - अमृत महाराष्ट्र

लातूरमधील उद्योजक मेळाव्यात अमृत संस्थेच्या योजनांचा जागर

जिल्हा व्यवस्थापकांनी दिली माहिती

लातूरमधील उद्योजक मेळाव्यात अमृत संस्थेच्या योजनांचा जागर मुख्य फोटो
लातूरमधील उद्योजक मेळाव्यात अमृत संस्थेच्या योजनांचा जागर अतिरिक्त फोटो

लातूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. ही संस्था उद्योजकतावाढीसाठी कसून प्रयत्न करते आणि त्याअनुषंगाने अनेक योजना व प्रशिक्षण कार्यक्रम राबवते. या योजना आणि प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी लातूरमधील उद्योजक मेळाव्यात अमृत संस्थेचे लातूर जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. 

लातूर जिल्हा कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि दे आसरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उद्योजक मेळावा शिक्षणमहर्षी वसंतराव काळे शासकीय प्रशिक्षण संस्थेत आयोजित करण्यात आला होता. कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्री. सूर्यवंशी, प्राचार्य श्री. माळकुणजे, उद्योजिका प्राजक्ता डोंगरे, पल्लवी पाटील आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर यांनी या वेळी अमृत संस्थेच्या योजना, अमृतपेठ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि अमृतपेठ थेट बाजारपेठेबद्दल माहिती दिली. उपस्थितांनी योजनांबद्दल कुतूहल व्यक्त केले. 

अधिक माहितीसाठी संपर्क : 

शुभम मुळजकर - ७३९१०६५४७० 

लातूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत

कार्यालयाचा पत्ता :

अमृत संस्थेचे लातूर जिल्हा कार्यालय,

पहिला मजला, पितृछाया बिल्डिंग,

मयुरेश्वर अपार्टमेंट, सिग्नल कॅम्प,

विद्यानगर, लातूर - ४१३५१२ 

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

https://mahaamrut.org.in/

Publisher: शुभम सुहासराव मुळजकर News publisher name | Date: 17-03-2026 News publication date | Time: 07:11 PM News publication time | Views: 135 Number of times this news has been viewed | District: latur Related district of the news
Publisher: शुभम सुहासराव मुळजकर News publisher name | Date: 17-03-2026 News publication date | Time: 07:11 PM News publication time | Views: 135 Number of times this news has been viewed | District: latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement