तुम्ही जीसीसी-टीबीसी परीक्षा उत्तीर्ण झाला आहात? अमृत संस्थेकडून मिळणार शुल्कपरतावा - अमृत महाराष्ट्र

तुम्ही जीसीसी-टीबीसी परीक्षा उत्तीर्ण झाला आहात? अमृत संस्थेकडून मिळणार शुल्कपरतावा

लवकरात लवकर संपर्क साधण्याचे आवाहन

 तुम्ही जीसीसी-टीबीसी परीक्षा उत्तीर्ण झाला आहात? अमृत संस्थेकडून मिळणार शुल्कपरतावा मुख्य फोटो
मुख्य फोटो

हिंगोली : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध कौशल्यविकास व अर्थसाह्य योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत. त्याअंतर्गत जीसीसी-टीबीसी अर्थात शासकीय टायपिंग व शॉर्टहँड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुल्कपरताव्याच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जात आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या जीसीसी-टीबीसी परीक्षेचा निकाल अलीकडेच जाहीर झाला असून, या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अमृत संस्थेतर्फे अर्थसाह्य योजना राबवली जाते. अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील पात्र उमेदवारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांच्या आधारे शुल्क परतावा दिला जाणार आहे. अर्ज करताना विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका, आवश्यक कागदपत्रे व इतर माहिती सादर करणे बंधनकारक असून सर्व कागदपत्रांच्या सेल्फ अटेस्टेड प्रती जोडणे आवश्यक आहे, असे हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत धोतरे यांनी सांगितले.

अमृत संस्थेच्या या उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले असून, अधिक माहितीसाठी संबंधितांनी आपल्या जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा.

संपर्क :

अमृत कार्यालय, हिंगोली – 7391065471

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Shrikant Dhotre News publisher name | Date: 18-03-2026 News publication date | Time: 12:49 PM News publication time | Views: 89 Number of times this news has been viewed | District: hingoli Related district of the news
Publisher: Shrikant Dhotre News publisher name | Date: 18-03-2026 News publication date | Time: 12:49 PM News publication time | Views: 89 Number of times this news has been viewed | District: hingoli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement