योजनाप्रसारासाठी महत्त्वपूर्ण बैठक
नागपूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनांचा, तसेच संस्थेच्या विविध उपक्रमांचा प्रसार करण्यासाठी संस्थेचे नागपूर जिल्हा व्यवस्थापक हर्षल गद्रे आणि विभागीय उपव्यवस्थापक ओंकार गांधी यांनी पटेल समाजाचे जॉइंट सेक्रेटरी मणिलाल पटेल यांची बगडगंज परिसरात सदिच्छा भेट घेतली. या वेळी पटेल यांना अमृत संस्थेची उद्दिष्टे, विविध उपक्रम, तसेच देण्यात येत असलेल्या लाभांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
या भेटीमध्ये सकारात्मक वातावरणात चर्चा पार पडली. अमृत संस्थेच्या कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त करून मणिलाल पटेल यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि सहकार्याचे आश्वासन दिले. या भेटीमुळे अमृत संस्थेच्या योजनांचा प्रसार अधिक व्यापक स्तरावर होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment