पालघर जिल्ह्यातही होणार अमृत संस्थेच्या योजनांचा प्रसार - अमृत महाराष्ट्र

पालघर जिल्ह्यातही होणार अमृत संस्थेच्या योजनांचा प्रसार

तालुकानिहाय अमृतमित्र आणि अमृतसखी यांची टीम सज्ज

पालघर जिल्ह्यातही होणार अमृत संस्थेच्या योजनांचा प्रसार मुख्य फोटो
पालघर जिल्ह्यातही होणार अमृत संस्थेच्या योजनांचा प्रसार अतिरिक्त फोटो

पालघर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या योजना लक्ष्यित गटापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक तर कार्यरत आहेतच; मात्र त्यांच्यासोबत स्वयंसेवी पद्धतीने काम करणारे अमृतमित्र आणि अमृतसखी यांची टीमही आहे. आता पालघरमध्येही अशी टीम तयार झाली आहे.

पालघर जिल्ह्याच्या तालुक्यांमध्ये अमृतमित्र आणि अमृतसखी यांची तालुकानिहाय टीम तयार आहे. अमृत संस्थेच्या योजना तळागाळातील लक्ष्यित गटातील लोकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचतील आणि नवे उद्योजक कसे घडतील या दृष्टीने अमृतमित्र व अमृतसखी प्रयत्नशील असतील.

सामाजिक कार्यकर्ते मंदार आठल्ये, अमित कापसे, अ‍ॅड. सौ. संयुक्ता तामोरे, गणेश देव, सौ. प्रभूताई आणि इतर हितचिंतक योजनांचा प्रसार आणि प्रचार करण्याचे कार्य करणार आहेत.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Rajesh Pawar News publisher name | Date: 18-03-2026 News publication date | Time: 08:17 PM News publication time | Views: 124 Number of times this news has been viewed | District: mumbai_city Related district of the news
Publisher: Rajesh Pawar News publisher name | Date: 18-03-2026 News publication date | Time: 08:17 PM News publication time | Views: 124 Number of times this news has been viewed | District: mumbai_city Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

A
Ashish shukla
20-03-2026 07:05 AM

Very nice ,

Write a Comment
0 / 50 words
Advertisement