महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते झाले उद्घाटन
जळगाव : स्थानिक उद्योजकांना चांगली बाजारपेठ मिळावी आणि नागरिकांना दर्जेदार स्वदेशी उत्पादने थेट उत्पादकांकडून खरेदी करता यावीत, या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे ‘अमृतपेठ – थेट बाजारपेठ’ हा विशेष उपक्रम राबवला जातो. २१-२२ मार्च रोजी जळगावमध्ये भरलेल्या अमृतपेठ थेट बाजारपेठेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते या बाजारपेठेचे उद्घाटन झाले.
या बाजारपेठेत अनेक छोट्या व्यावसायिकांनी, महिलांनी आपली उत्पादने, हाताने बनवलेल्या वस्तू, अलंकार, दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि खाद्यपदार्थ, साठवणुकीचे आणि वाळवणाचे पदार्थ मांडले होते. या उत्पादनांची मोठ्या प्रमाणात विक्री होऊन चांगली आर्थिक उलाढाल झाली. या वेळी जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे उर्फ राजूमामा भोळे, लक्ष्यित समाजाच्या नगरसेविका अॅडव्होकेट सुचिता हाडा, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, ब्रह्मश्री परिवाराचे अशोक वाघ, कमलाकर फडणवीस, उद्योजक श्री. म्हाळस यांच्यासह लक्ष्यित समाजातील अनेक उद्योजक उपस्थित होते. अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कानडे, विभागप्रमुख दीपक गुप्ता, अमृतमित्र प्रज्योत कुलकर्णी, विनोद देशपांडे, किरण शिंपी, अमृतसखी गौरी चौधरी यांच्यासह अमृतपेठेच्या यशस्वी आयोजनात उत्तम सहकार्य केलेल्या अमृतसखी दीपाली भावे, रचना तिवारी, पूनम तिवारी या वेळी उपस्थित होते.
आमदार सुरेश भोळे, माजी नगरसेवक मनोज काळे, राजपूत समाजाचे सामाजिक कार्यकर्ते अतुलसिंह हाडा यांचे सहकार्य लाभले. जळगाव जनता सहकारी बँकेनेही मदत केली. बँकेचे चेअरमन सतीश मदाने, बँकेच्या संचालिका सौ. आरती हुजूरबाजार, बहुभाषक ब्राह्मण समाजाचे प्रमुख, बांधकाम व्यावसायिक श्रीकांत खटोड, अग्रवाल समाजाचे प्रमुख पवन मित्तल, उल्हास जोशी, श्रीकृष्ण न्यासाचे विभागप्रमुख प्रसाद निशानदार, वसुनंदिनी फाउंडेशनच्या माधुरी कुळकर्णी, पंकज पवनीकर व सौ. मंजूषा पवनीकर, प्रिंट मीडियाचे प्रसाद जोशी, अमृतवर्ग व बालसंस्कार वर्गाचे सेवा वस्ती विभागात आयोजन करणारे श्री शुक्ल महाराज, पूजापाठ करणारे सुनील जोशी, उद्योजक अजित झारे, प्रचार विभागाचे पंकज जोशी, अनेक सामाजिक कार्यकर्ते विविध तज्ज्ञ डॉक्टर, अमृत संस्थेचे लाभार्थी आणि विद्यार्थ्यांनी बाजारपेठेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
ज्या छोट्या व्यवसायिकांनी आपले स्टॉल यामध्ये उभारले होते, त्यांनी पुढील अमृतपेठेचे आयोजन तालुकास्तरावर करण्याची मागणी केली आणि त्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. पुढील अमृतपेठ जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात होईल, अशी ग्वाही अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कानडे यांनी दिली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment