अमृत संस्थेच्या गडचिरोली कार्यालयात सामूहिक श्रीरामरक्षा स्तोत्रपठण - अमृत महाराष्ट्र

अमृत संस्थेच्या गडचिरोली कार्यालयात सामूहिक श्रीरामरक्षा स्तोत्रपठण

सामाजिक एकात्मतेसाठी आयोजन; अमृत संस्थेच्या योजनांचाही प्रसार

अमृत संस्थेच्या गडचिरोली कार्यालयात सामूहिक श्रीरामरक्षा स्तोत्रपठण मुख्य फोटो
अमृत संस्थेच्या गडचिरोली कार्यालयात सामूहिक श्रीरामरक्षा स्तोत्रपठण अतिरिक्त फोटो

गडचिरोली : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत संस्थेच्या गडचिरोली कार्यालयात सामूहिक रामरक्षा स्तोत्रपठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संस्थेच्या लक्ष्यित गटातील बंधू-भगिनी यामध्ये सहभागी झाले होते. सध्या चैत्री नवरात्र सुरू असून, २६ मार्च रोजी रामनवमी आहे. त्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देव-देश-धर्म यांबद्दल भक्तिभाव जागृत करणे, समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे, एकात्मता वाढवणे आणि अमृत संस्थेचा प्रचार-प्रसार हा या उपक्रमाचा हेतू होता.

सर्व भाविकांनी एकत्रित रामरक्षा पठण केल्याने वातावरण प्रसन्न झाले. त्यानंतर सर्वांनी श्री हनुमान स्तुतीही म्हटली आणि शेवटी आरती झाली. कार्यक्रमाच्या अखेरीस सर्वांना अमृत संस्थेच्या सर्व उपक्रमांबद्दल आणि योजनांविषयी माहिती देण्यात आली. प्रसाद वाटपानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला. अमृत संस्थेचे गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कर्मचारी या वेळी उपस्थित होते. त्यांमध्ये माधुरीताई रोडकर, गौरव दुपल्लीवार, वेदान्त मेहता यांचा समावेश होता.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Gaurav Dupalliwar News publisher name | Date: 25-03-2026 News publication date | Time: 11:59 AM News publication time | Views: 193 Number of times this news has been viewed | District: gadchiroli Related district of the news
Publisher: Gaurav Dupalliwar News publisher name | Date: 25-03-2026 News publication date | Time: 11:59 AM News publication time | Views: 193 Number of times this news has been viewed | District: gadchiroli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement