धाराशिवमध्ये अमृत आरीवर्क प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात - अमृत महाराष्ट्र

धाराशिवमध्ये अमृत आरीवर्क प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात

अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आयोजन

धाराशिवमध्ये अमृत आरीवर्क प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात मुख्य फोटो
धाराशिवमध्ये अमृत आरीवर्क प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात अतिरिक्त फोटो

धाराशिव : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे धाराशिव शहरातील आचार्य गल्ली येथे अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आरीवर्क प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणार्थ्यांना मोफत उद्यम आधार, अमृत संस्थेचे प्रमाणपत्र आणि अमृतपेठ या डिजिटल माध्यमातून व्यवसायासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक चिन्मय कुलकर्णी व उपव्यवस्थापक अजय कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सौ. सगुणा आचार्य, ज्ञानदा सुशिक्षित बेरोजगार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गोपाल आचार्य, सुवर्णा कुलकर्णी, वंदना थिटे, माधुरी राजाज्ञे, सुवर्णा आचार्य, अन्नपूर्णा कुलकर्णी, प्रशिक्षिका सौ पूजा आचार्य यांच्यासह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी संपर्क : 73910 65469 

पत्ता : अमृत संस्थेचे धाराशिव जिल्हा कार्यालय,

ऋणानुबंध, तळमजला, वृंदावन कॉलनी,

जिल्हा कारागृहासमोर, धाराशिव 


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/



Publisher: Chinmay Kulkarni News publisher name | Date: 23-03-2026 News publication date | Time: 11:46 AM News publication time | Views: 34 Number of times this news has been viewed | District: dharashiv Related district of the news
Publisher: Chinmay Kulkarni News publisher name | Date: 23-03-2026 News publication date | Time: 11:46 AM News publication time | Views: 34 Number of times this news has been viewed | District: dharashiv Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement