परतवाडा येथे पाच-सहा एप्रिलला भरणार अमृतपेठ थेट बाजारपेठ - अमृत महाराष्ट्र

परतवाडा येथे पाच-सहा एप्रिलला भरणार अमृतपेठ थेट बाजारपेठ

ग्राहकांना खरेदी करता येणार दर्जेदार स्वदेशी उत्पादने; चित्रकला स्पर्धेचेही आयोजन

परतवाडा येथे पाच-सहा एप्रिलला भरणार अमृतपेठ थेट बाजारपेठ मुख्य फोटो
परतवाडा येथे पाच-सहा एप्रिलला भरणार अमृतपेठ थेट बाजारपेठ अतिरिक्त फोटो

परतवाडा (जि. अमरावती) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे अमृतपेठ थेट बाजारपेठ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पाच आणि सहा एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत वाघामाता संस्थानात हे प्रदर्शन भरवले जाणार असून, पाच एप्रिलला चित्रकला स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे.

अमृतपेठ थेट बाजारपेठ या प्रदर्शनात विविध दर्जेदार, स्वदेशी उत्पादने, हस्तकला उत्पादने, दागिने, कापड, खाद्यपदार्थ, तसेच स्थानिक उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तूंचे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. ग्राहकांना थेट उत्पादकांकडून वस्तू खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार असून, स्थानिक उद्योजकांना मोठे व्यासपीठ मिळणार आहे.

पाच एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे स्थानिक उद्योगांना चालना आणि स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन मिळणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अधिक माहिती आणि स्टॉल बुकिंगसाठी संपर्क : 7249451152, 9527317068

दिनांक आणि वेळ : पाच व सहा एप्रिल २०२६, सकाळी १० ते रात्री १०

स्थळ : शेवाळकर सभागृह, वाघामाता संस्थान, परतवाडा, जि. अमरावती

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/




Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 23-03-2026 News publication date | Time: 03:58 PM News publication time | Views: 28 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 23-03-2026 News publication date | Time: 03:58 PM News publication time | Views: 28 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement