साताऱ्यात अमृत संस्थेतर्फे २२ डिसेंबरपासून मोफत बेकरी प्रशिक्षण; खुल्या प्रवर्गातील तरुण आणि महिलांना उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी - अमृत महाराष्ट्र

साताऱ्यात अमृत संस्थेतर्फे २२ डिसेंबरपासून मोफत बेकरी प्रशिक्षण; खुल्या प्रवर्गातील तरुण आणि महिलांना उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी

सातारा : खुल्या प्रवर्गातील तरुणांना आणि महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्योजकता वाढवण्यासाठी अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था कार्यरत आहे. या संस्थेने साताऱ्यात येत्या २२ डिसेंबर २०२५ पासून महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या सहकार्याने मोफत बेकरी प्रशिक्षण आयोजित केले आहे.

फोटो उपलब्ध नाहीत

या बातमीशी संबंधित कोणतेही फोटो उपलब्ध नाहीत

सातारा : खुल्या प्रवर्गातील तरुणांना आणि महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्योजकता वाढवण्यासाठी अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था कार्यरत आहे. या संस्थेने साताऱ्यात येत्या २२ डिसेंबर २०२५ पासून महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या सहकार्याने मोफत बेकरी प्रशिक्षण आयोजित केले आहे.

अमृत संस्था ही खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजातील मुला-मुलींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देते. केवळ नोकरीच्या मागे न लागता तरुणांनी स्वतःचे उद्योग उभे करावेत, या उद्देशाने विविध तांत्रिक प्रशिक्षणे या संस्थेमार्फत दिली जातात. बेकरी प्रशिक्षण कार्यक्रमही त्याचाच एक भाग आहे.

प्रशिक्षणाचे स्वरूप आणि फायदे :
प्रशिक्षणामध्ये बेकरी उत्पादने बनवण्यासोबतच व्यवसाय कसा उभा करायचा, याचेही मार्गदर्शन केले जाईल.

अमृत संस्थेमार्फत प्रशिक्षणासोबतच पुढील वाटचालीसाठी आवश्यक शैक्षणिक आणि तांत्रिक माहिती पुरवली जाते.

बेकरी उद्योगातील वाढती मागणी लक्षात घेता, हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या तरुणांना स्वतःचे युनिट सुरू करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

साताऱ्यातील इच्छुक उमेदवारांसाठी हे प्रशिक्षण २२ डिसेंबर २०२५ पासून सुरू होत आहे. या सुवर्णसंधीचा लाभ जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील अनेक होतकरू तरुणांना आणि महिलांना रोजगाराची नवी दिशा मिळणार आहे.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Vinayak Pathakji News publisher name | Date: 19-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 104 Number of times this news has been viewed | District: satara Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement