सावरखेडमध्ये अमृत संस्थेतर्फे महिलांची विशेष बैठक - अमृत महाराष्ट्र

सावरखेडमध्ये अमृत संस्थेतर्फे महिलांची विशेष बैठक

उद्योजकतावाढीसंदर्भात करण्यात आले मार्गदर्शन

सावरखेडमध्ये अमृत संस्थेतर्फे महिलांची विशेष बैठक मुख्य फोटो
मुख्य फोटो

मोर्शी (जि. अमरावती) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यातील सावरखेड येथे महिलांकरिता मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर यांनी मार्गदर्शन केले.

या बैठकीत गावातील महिला बचत गटांमधील सदस्या उपस्थित होत्या. काही महिला सध्या बचत गटाच्या माध्यमातून विविध व्यवसाय करत असून, तर काही महिला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांना अमृत संस्थेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजना, व्यवसायाच्या संधींची माहिती देण्यात आली. यामुळे स्वावलंबनासाठी प्रेरणा मिळाली असल्याची भावना लक्ष्यित गटातील महिलांनी व्यक्त केली. आगामी काळात अधिकाधिक महिलांनी उद्योग-व्यवसाय क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 23-03-2026 News publication date | Time: 04:59 PM News publication time | Views: 29 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 23-03-2026 News publication date | Time: 04:59 PM News publication time | Views: 29 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement