प्रवीण तायडे, केवलराम काळे आणि गजानन लवटे यांना निमंत्रण
अचलपूर (जि. अमरावती) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-अचलपूर येथे अमृतपेठ थेट बाजारपेठ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पाच आणि सहा एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत वाघामाता संस्थानात हे प्रदर्शन भरवले जाणार आहे. या प्रदर्शनाचे मुख्य उद्घाटक म्हणून आमदार प्रवीण तायडे आणि विशेष उद्घाटक म्हणून आमदार केवलराम काळे आणि आमदार गजानन लवटे यांना निमंत्रण देण्यात आले.
स्थानिक उद्योजक, महिला बचत गट व गृहोद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या माध्यमातून स्थानिक उत्पादकांची विविध घरगुती व हस्तकला उत्पादने उपलब्ध करण्यात येणार आहेत.
अधिक माहिती आणि स्टॉल बुकिंगसाठी संपर्क : 7249451152, 9527317068
दिनांक आणि वेळ : पाच व सहा एप्रिल २०२६, सकाळी १० ते रात्री १०
स्थळ : शेवाळकर सभागृह, वाघामाता संस्थान, परतवाडा, जि. अमरावती
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment