अमृत संस्थेच्या ड्रोन मिशनमध्ये हर्ष राठी यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले ड्रोन प्रशिक्षण
मोर्शी (जि. अमरावती) : येथील हर्ष निशांत राठी यांनी अमृत संस्थेच्या मोफत ड्रोन प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतला. मुंबईत २१ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत त्यांनी प्रिसिजन फार्मिंग व ड्रोन फवारणी या विषयातील रिमोट पायलट प्रशिक्षण कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला. लाखो रुपयांचे हे ड्रोन पायलट प्रशिक्षण अमृत संस्थेने पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्याने कृतज्ञतेची भावना हर्ष राठी यांनी व्यक्त केली.
या प्रशिक्षणामध्ये त्यांनी आधुनिक शेतीसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर, अचूक फवारणी तंत्र, डीजीसीएचे नियम, बॅटरी व्यवस्थापन, सुरक्षितता नियम, तसेच प्रत्यक्ष ड्रोन उड्डाणाचे सखोल ज्ञान मिळवले. अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हर्ष राठी यांनी प्रात्यक्षिकांद्वारे कौशल्य प्राप्त केले.
हर्ष राठी यांनी सांगितले, की 'अमृत संस्थेची प्रशिक्षण पद्धत अत्यंत उत्कृष्ट असून राहण्याची, भोजनाची व्यवस्था दर्जेदार होती. या कोर्समुळे आधुनिक शेतीत नव्या संधी उपलब्ध झाल्या असून, युवा शेतकऱ्यांसाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त आहे.'
हर्ष राठी यांनी अमृत संस्था व सर्व प्रशिक्षकांचे आभार मानून, शेतीत प्रगती करू इच्छिणाऱ्या युवकांनी असे प्रशिक्षण अवश्य घ्यावे, असे आवाहन केले.
- केदार दीपक गोगरकर
अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत
संपर्क : 9112227635
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment