'अमृत'च्या योजनेअंतर्गत यशस्वीरीत्या पूर्ण केले कृषी ड्रोन फवारणी प्रशिक्षण; आधुनिक उद्योजकतेकडे पाऊल
तिवसा (जि. अमरावती) : येथील राज दिलीप राठी यांनी अमृत संस्थेच्या मोफत ड्रोन प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतला. मुंबईत २१ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत त्यांनी प्रिसिजन फार्मिंग व ड्रोन फवारणी या विषयातील रिमोट पायलट प्रशिक्षण कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला.
या प्रशिक्षणात राज राठी यांना ड्रोनची रचना, अचूक औषध फवारणी, डोस कॅल्क्युलेशन, रिमोट ऑपरेशन, 'डीजीसीए'ची मार्गदर्शक तत्त्वे यांविषयी मार्गदर्शन मिळाले आणि शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. प्रशिक्षणातून मिळालेले कौशल्य आत्मनिर्भरतेकडे नेणारे प्रभावी शस्त्र असून, संस्थेच्या प्रशिक्षकांनी केलेले मार्गदर्शन, प्रत्यक्ष सराव आणि तांत्रिक माहितीमुळे आत्मविश्वास वाढला, असे त्यांनी नमूद केले.
राज राठी यांनी सांगितले, की 'अमृत संस्थेच्या या प्रशिक्षण वर्गातील स्वच्छ निवास, उत्तम भोजन आणि शिस्तबद्ध प्रशिक्षण या सुविधांमुळे हा अनुभव अत्यंत संस्मरणीय ठरला. कृषी क्षेत्रात आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी हे प्रशिक्षण म्हणजे महत्त्वाचे पाऊल आहे.'
राज राठी यांनी अमृत संस्थेचे मनःपूर्वक आभार मानून, शेतीत नवे तंत्रज्ञान आत्मसात करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी हा कोर्स अत्यंत लाभदायी असल्याचे सांगितले. शेती क्षेत्रातील आधुनिक सेवांमधून आर्थिक प्रगती साधून रोजगारनिर्मितीचे स्वप्न साकार करण्याची प्रेरणा राज यांना मिळाली आहे.
- केदार दीपक गोगरकर
अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत
संपर्क : 9112227635
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment