अमृत संस्थेच्या निःशुल्क, पण दर्जेदार ड्रोन प्रशिक्षणातून कौशल्यप्राप्ती आणि रोजगारक्षमता

बदलापूर येथील प्रतीक रिसबूड यांनी घेतले कृषी क्षेत्रातील ड्रोन पायलट बनण्याचे प्रशिक्षण

अमृत संस्थेच्या निःशुल्क, पण दर्जेदार ड्रोन प्रशिक्षणातून कौशल्यप्राप्ती आणि रोजगारक्षमता मुख्य फोटो
अमृत संस्थेच्या निःशुल्क, पण दर्जेदार ड्रोन प्रशिक्षणातून कौशल्यप्राप्ती आणि रोजगारक्षमता अतिरिक्त फोटो

ठाणे : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या निःशुल्क ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ बदलापूर (जि. ठाणे) येथील प्रतीक मिलिंद रिसबूड यांनी घेतला. 'ड्रोन वर्ल्ड'च्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात रिसबूड यांनी कृषी क्षेत्रातील फवारणी या विषयासंदर्भातील प्रशिक्षण पूर्ण करून मीडियम रिमोट पायलट सर्टिफिकेट यशस्वीरीत्या प्राप्त केले. 

या प्रशिक्षणात ड्रोन चालवणे, सुरक्षितता, नियोजन, फवारणीचे तंत्र, प्रत्यक्ष उड्डाण, तसेच कृषी क्षेत्रात ड्रोनच्या प्रभावी वापराबद्दल त्यांना अतिशय उपयुक्त मार्गदर्शन मिळाले. प्रशिक्षकांनी प्रत्येक विषय सोप्या आणि व्यावहारिक पद्धतीने समजावून सांगितला. त्यामुळे प्रशिक्षण अधिक परिणामकारक ठरले, असे मत रिसबूड यांनी व्यक्त केले. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून कौशल्याधारित प्रशिक्षणाचीही गरज आहे. म्हणूनच अमृत संस्थेचे हे प्रशिक्षण वेगळे ठरते.

या प्रशिक्षणामुळे रिसबूड यांना कौशल्यप्राप्ती तर झालीच आहे. शिवाय त्यांचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला असून, भविष्यात त्यांना ड्रोन आणि कृषी क्षेत्रात व्यावसायिक पद्धतीने काम करण्याची इच्छा आहे. त्यांना ड्रोन विकत घेण्याची इच्छा असून, त्यासाठी त्यांना अमृत संस्थेच्या कर्ज व्याजपरतावा योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. त्या संदर्भातील माहिती संस्थेतर्फे त्यांना देण्यात आली असून, लवकरच ते आपली कागदपत्रे सादर करणार आहेत. 

रिसबूड यांनी अमृत संस्था आणि संपूर्ण प्रशिक्षण टीमचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच भविष्यातही अशाच उपयुक्त कौशल्यविकास योजना अमृत संस्थेकडून राबवल्या जाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तुम्हालाही घ्यायचे आहे का दर्जेदार ड्रोन प्रशिक्षण मोफत? अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


अमृत संस्थेच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचे अनुभव वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: माया रत्नपारखी -खेत्रे News publisher name | Date: 14-05-2026 News publication date | Time: 02:59 PM News publication time | Views: 2,416 Number of times this news has been viewed | District: Thane Related district of the news
Publisher: माया रत्नपारखी -खेत्रे News publisher name | Date: 14-05-2026 News publication date | Time: 02:59 PM News publication time | Views: 2,416 Number of times this news has been viewed | District: Thane Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 2 Comments

a
anand acharya
14-05-2026 08:28 PM

खूपच छान प्रतीक
अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा

Y
Yashwant risbud
14-05-2026 06:43 PM

Very nice achievement pratik , congratulations

Write a Comment
0 / 50 words
Advertisement