नाशिकच्या मयूर ठोंबरेच्या स्वप्नांना 'ड्रोनभरारी'चे पंख!

अमृत संस्थेच्या योजनेतून मोफत घेता आले शेती व्यवसायातील ड्रोनच्या वापराचे दर्जेदार व्यावसायिक प्रशिक्षण

नाशिकच्या मयूर ठोंबरेच्या स्वप्नांना 'ड्रोनभरारी'चे पंख! मुख्य फोटो
नाशिकच्या मयूर ठोंबरेच्या स्वप्नांना 'ड्रोनभरारी'चे पंख! अतिरिक्त फोटो

नाशिक : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवते. या संस्थेच्या मोफत ड्रोन प्रशिक्षणवर्गाचा लाभ नाशिक जिल्ह्यातील मयूर ठोंबरे या तरुणाला मिळाला आहे. 

वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करण्यासाठी लक्ष्यित घटकातील लाभार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसाय उभा करण्यासाठी अमृत संस्था मदत करते. ड्रोनचा विविध क्षेत्रांतील वाढता वापर बघता प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. तसेच व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. हे ओळखून अमृत संस्थेने ड्रोन प्रशिक्षणवर्ग सुरू केला आहे. नाशिक जिल्ह्यातील मयूर ठोंबरे याने या प्रशिक्षणासाठी अमृत संस्थेकडे अर्ज केला होता. शेती व्यवसायातील ड्रोन वापर या प्रशिक्षणासाठी त्याची निवड झाली होती. त्याने नाशिक येथे हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.

हे प्रशिक्षण अतिशय उपयोगी व मार्गदर्शक असल्याचे मयूरने सांगितले. 'मी स्वतः ड्रोन रिमोट कंट्रोलने उडवले. थिअरी आणि प्रॅक्टिकल अशा दोन्ही स्वरूपाची सखोल माहिती आणि मार्गदर्शन या प्रशिक्षणात मिळाले. अशा पद्धतीचे प्रशिक्षण व्यवसाय सुरू करण्यासाठी व उद्योजक होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे,' असे मयूर म्हणाला. या ड्रोन प्रशिक्षणवर्गाचा लाभ जास्तीत जास्त तरुणांनी घ्यावा, असे आवाहन त्याने अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटाला केले आहे.

'अमृत संस्थेच्या या योजनेमुळे मला मोठी संधी मिळाली आहे. ड्रोन प्रशिक्षण आताच्या काळात खूप गरजेचे असून मी या प्रशिक्षणाचा माझ्या व्यवसायासाठी सर्वोत्तम उपयोग करीन. अमृत संस्थेचा मी मनापासून आभारी आहे,' अशा भावना मयूरने व्यक्त केल्या.

..............

तुम्हालाही घ्यायचे आहे का हे प्रशिक्षण? अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

अमृत संस्थेच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचे अनुभव वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Mangesh Khadilkar News publisher name | Date: 27-05-2026 News publication date | Time: 01:08 PM News publication time | Views: 36 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Mangesh Khadilkar News publisher name | Date: 27-05-2026 News publication date | Time: 01:08 PM News publication time | Views: 36 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement