१० दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात शिकता येणार उद्योजकतेचे विविध पैलू
परतवाडा : अमरावतील जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील परतवाडा येथे महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे उद्योजकता विकास कार्यक्रम (ईडीपी) सुरू करण्यात येत आहे. १८ मे २०२६पासून या प्रशिक्षणाच्या बॅचला प्रारंभ करण्यात येत आहे. या प्रशिक्षणामध्ये खुल्या प्रवर्गातील लक्ष्यित गटातील महाविद्यालयीन तरुण, महिला, तसेच नवउद्योजकांना व्यवसाय विकासाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
व्यवसायासाठी प्रभावी मार्केटिंग कसे करावे, ग्राहकांपर्यंत उत्पादन पोहोचवण्याच्या विविध पद्धती कोणत्या, अमृतपेठ ई-कॉमर्स, जाहिरातीसाठी सोशल मीडियाचा वापर, विक्री वाढवण्याच्या संधी, अमृतपेठ प्रदर्शन, विविध योजनांसाठी नोंदणी कशी करायची अशा विविध बाबींचे प्रशिक्षण या कार्यक्रमात दिले जाणार आहे.
शासनाच्या विविध योजनांची माहिती, व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक कागदपत्रे, आर्थिक नियोजन व स्वावलंबनाकडे वाटचाल याबाबतचे मार्गदर्शनही या प्रशिक्षणाच्या १० दिवसांच्या कालावधीत केले जाणार असल्याचे अमृत संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे.
प्रशिक्षणस्थळ :
रोहित पांडे सेतू केंद्र, टिळक चौक,
डॉक्टर पट्टलवार लाइन, परतवाडा
अधिक माहितीसाठी संपर्क :
केदार गोगरकर - 9112227635
अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत
ऋषीकेश कथलकर - 7249451152
अमरावती जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 1 Comments
हार्दिक अशोक फाये
नागपुर जिल्ह्या माधिल मौदा कड़े काही काम आहे का आपल
Write a Comment