ब्रह्मक्षत्रिय समाजाच्या महाअधिवेशनात अमृत संस्थेच्या योजनांचा जागर

सप्तश्रुंगी गडावर आयोजन

ब्रह्मक्षत्रिय समाजाच्या महाअधिवेशनात अमृत संस्थेच्या योजनांचा जागर मुख्य फोटो
ब्रह्मक्षत्रिय समाजाच्या महाअधिवेशनात अमृत संस्थेच्या योजनांचा जागर अतिरिक्त फोटो

वणी : नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तश्रुंगी गड येथे ब्रह्मक्षत्रिय (ठाकूर) समाज महाअधिवेशन १८ मे रोजी आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्याला अमृत संस्थेचे नाशिक जिल्हा व्यवस्थापक संजय गोसावी, अमृतमित्र मयूर हातवळणे उपस्थित होते. त्यांनी उपस्थित सर्व ठाकूर समाजाला अमृत संस्थेच्या सर्व योजनाची सविस्तर माहिती दिली. 

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजेच अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील जातींसाठी काम करते आणि त्यात ब्रह्मक्षत्रिय (ठाकूर) समाजाचाही समावेश आहे. कुटुंबातील प्रत्येक घटकासाठी म्हणजे विद्यार्थी, तरुण, महिला, पुरुष, उद्योजक अशा सर्वांसाठी अमृत संस्था वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून काम करते. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक योजना, व्यावसायिकांसाठी वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना, अमृत कौशल्य प्रशिक्षण योजना आदींची माहिती देण्यात आली.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: संजय गोसावी, नाशिक News publisher name | Date: 20-05-2026 News publication date | Time: 04:00 PM News publication time | Views: 3,327 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: संजय गोसावी, नाशिक News publisher name | Date: 20-05-2026 News publication date | Time: 04:00 PM News publication time | Views: 3,327 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement