हिंगोली येथे ‘अमृत पर्यटन’ उपक्रमांतर्गत पर्यटन क्षेत्राशी संबंधित उद्योजक, व्यावसायिक व नवउद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमाचे (EDP) आयोजन .
अमृत संस्थेमार्फत उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन
हिंगोली : महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या रूपाने कार्यरत असलेल्या ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत पर्यटन’ उपक्रमांतर्गत पर्यटन क्षेत्राशी संबंधित उद्योजक, व्यावसायिक व नवउद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रम (EDP) आयोजित करण्यात आला आहे.
पर्यटन क्षेत्राला चालना देणे, स्थानिक रोजगार निर्मिती वाढवणे आणि पर्यटन व्यवसाय अधिक सक्षम करणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पर्यटन क्षेत्र हे रोजगार निर्मिती व आर्थिक विकासासाठी महत्त्वाचे क्षेत्र असून, या क्षेत्रातील उद्योजकांना आधुनिक व्यवसाय व्यवस्थापनाचे कौशल्य प्राप्त व्हावे यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात टूर अँड ट्रॅव्हल्स व्यावसायिक, पर्यटक मार्गदर्शक, कुक अँड केटरर्स, होमस्टे व रिसॉर्ट संचालक, पर्यटन सेवा पुरवठादार, धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनाशी संबंधित उद्योजक तसेच पर्यटन क्षेत्रात नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणारे युवक-युवती सहभागी होऊ शकतात.
कार्यक्रमादरम्यान व्यवसाय उभारणी व विस्तार, प्रभावी व्यवसाय नियोजन, डिजिटल मार्केटिंग, ग्राहक व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, ब्रँडिंग, पर्यटन क्षेत्रातील नव्या व्यवसाय संधी तसेच शासनाच्या विविध योजना व सहाय्य योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय पर्यटन क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ आणि यशस्वी उद्योजकांचे अनुभवाधारित मार्गदर्शनही सहभागींसाठी उपलब्ध राहणार आहे.
पर्यटन क्षेत्रात स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे, नवउद्योजकांना सक्षम करणे आणि पर्यटन व्यवसायाचा व्यापक विकास घडवून आणणे हा ‘अमृत पर्यटन’ उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पर्यटन क्षेत्राशी संबंधित सर्व उद्योजक, व्यावसायिक तसेच इच्छुक युवक-युवतींनी या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 7391065471
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment