अमृतच्या ड्रोन पायलट प्रशिक्षण योजनेला लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अमृतच्या ड्रोन पायलट प्रशिक्षणामुळे लाभार्थ्यांना समजली नाविन्यपूर्ण माहिती आणि उपलब्ध झाल्या करिअरच्या नव्या संधी.

अमृतच्या ड्रोन पायलट प्रशिक्षण योजनेला लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुख्य फोटो
मुख्य फोटो

मालेगाव : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या AMRUTच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या ड्रोन पायलट प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेल्या मालेगाव येथील वंश विशाल शर्मा आणि गिरीश भालचंद्र जोशी यांनी अमृत संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

प्रशिक्षणाबाबत आपले अनुभव सांगताना दोन्ही लाभार्थ्यांनी सांगितले की, "ड्रोन पायलट प्रशिक्षणामुळे आधुनिक तंत्रज्ञानाची सखोल माहिती आम्हाला मिळाली असून भविष्यात रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे." प्रशिक्षणादरम्यान तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून दर्जेदार मार्गदर्शन मिळाले तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळे विषय समजून घेणे अधिक सोपे झाले.

त्यांनी पुढे सांगितले की, "प्रशिक्षणाची संपूर्ण व्यवस्था अतिशय उत्तम होती. उत्तम व्यवस्थेमुळे प्रशिक्षणाचा अनुभव अधिक समृद्ध झाला." प्रशिक्षण केंद्रावरील सुविधा, नियोजन आणि व्यवस्थापन याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी त्यांनी युवकांना आवाहन करत सांगितले की, शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास व रोजगाराभिमुख योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. अशा योजनांमुळे नवीन कौशल्ये आत्मसात करून स्वतःच्या प्रगतीचा मार्ग खुला होऊ शकतो.

शेवटी वंश विशाल शर्मा व गिरीश भालचंद्र जोशी यांनी अमृत नाशिक जिल्हा टीमचे मनःपूर्वक आभार मानत, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपयुक्त उपक्रमांबद्दल अमृत संस्थेचे कौतुक केले.

"अमृतच्या ड्रोन पायलट प्रशिक्षणामुळे आम्हाला नवीन ज्ञान, आत्मविश्वास आणि करिअरच्या नव्या संधी मिळाल्या. यासाठी आम्ही अमृत नाशिक जिल्हा टीमचे मनःपूर्वक आभारी आहोत," अशी सकारात्मक भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Mangesh Khadilkar News publisher name | Date: 18-06-2026 News publication date | Time: 12:36 PM News publication time | Views: 89 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Mangesh Khadilkar News publisher name | Date: 18-06-2026 News publication date | Time: 12:36 PM News publication time | Views: 89 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement