अमरावतीत अमृत संस्थेचा सहा दिवसांचा क्षमताबांधणी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू - अमृत महाराष्ट्र

अमरावतीत अमृत संस्थेचा सहा दिवसांचा क्षमताबांधणी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू

स्वयंरोजगार आणि उद्योजकता विकास हा मुख्य उद्देश

अमरावतीत अमृत संस्थेचा सहा दिवसांचा क्षमताबांधणी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू मुख्य फोटो
अमरावतीत अमृत संस्थेचा सहा दिवसांचा क्षमताबांधणी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू अतिरिक्त फोटो

अमरावती : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने अमरावतीमध्ये लक्ष्यित गटासाठी सहा दिवसांचा कपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम अर्थात क्षमताबांधणी प्रशिक्षण कार्यक्रम आज (२९ डिसेंबर) सुरू केला आहे. अमृत अर्थात महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, ती खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. लाभार्थ्यांना स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या दृष्टीने सक्षम करण्याच्या उद्देशाने हा मोफत प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या (एमसीईडी) अमरावती केंद्राच्या सहकार्याने राबवण्यात येत आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन अमृत संस्थेचे अमरावती विभाग व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले. अमृत संस्थेचे अमरावती जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर, उपव्यवस्थापक ऋषिकेश कथलकर, त्याचप्रमाणे 'एमसीईडी-अमरावती' चे प्रकल्प अधिकारी राजेश सुने, विभागीय लेखापाल कला खैरे, जिल्हा प्रकल्प समन्वयक नेत्रदीप चौधरी, कार्यक्रम आयोजक स्वप्नील इसळ आदी मान्यवरांसह प्रशिक्षणार्थी लाभार्थी उपस्थित होते.
प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्माण झाला पाहिजे ही अमृत संस्थेची भूमिका असून, अमृत संस्थेचा लाभार्थी हा रोजगार देणारा उद्योजक झाला पाहिजे, असे ध्येय असल्याचे विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर यांनी सांगितले. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून अद्ययावत प्रशिक्षण लाभार्थ्यांना दिले जाईल व त्यांचा स्वयंरोजगार वृद्धिंगत होण्यासाठी पूर्ण प्रयत्नशील राहू, असे एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी राजेश सुने यांनी सांगितले.

या सहा दिवसांच्या क्षमताबांधणी प्रशिक्षणात उद्योग वृद्धिंगत करण्याची संपूर्ण प्रक्रिया, उद्योजकतेसाठी व्यवसाय नियोजन, खर्च व नफा व्यवस्थापन, बाजारपेठेची ओळख, ग्राहक व्यवहार कौशल्य, तसेच शासकीय योजना व अर्थसाह्याची माहिती याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सैद्धांतिक प्रशिक्षणासोबतच प्रात्यक्षिक सत्रांद्वारे सहभागी प्रशिक्षणार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहभागी लाभार्थ्यांना अमृत व एमसीईडी या संस्थांच्या माध्यमातून आवश्यक मार्गदर्शन, समुपदेशन व सहकार्य करण्यात येईल. त्याचप्रमाणे योजनांचा लाभ देण्यात येईल असे या वेळी सांगण्यात आले.

या उपक्रमामुळे अमरावती जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गातील लक्ष्यित गटातील व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळणार असून, स्वयंरोजगार निर्मितीच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. त्याचबरोबर अमृततर्फे ड्रोन रिमोट पायलट प्रशिक्षणपासून ते उद्योजकता विकास प्रशिक्षणापर्यंत अनेक विषयांचे प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येत असून, सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पत्ता : अमृत संस्थेचे अमरावती विभागीय कार्यालय,
आशीर्वाद बिल्डिंग, मालटेकडीसमोर,
टोपेनगर, अमरावती
केदार गोगरकर - 9112227635
अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत
ऋषिकेश कथलकर - 7249451152
जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
.....
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in

Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 29-12-2025 News publication date | Time: 06:30 PM News publication time | Views: 507 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 29-12-2025 News publication date | Time: 06:30 PM News publication time | Views: 507 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

महेश नीता मोहन गर्दे
01-01-2026 01:08 AM

अभिनंदन... खूप छान उपक्रम

Write a Comment
0 / 50 words
Advertisement