अमृत आणि जिल्हा उद्योग केंद्राचा समन्वय अधिक बळकट होणार
नागपूर : राज्य शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या अमृतचे नागपूर जिल्हा व्यवस्थापक हर्षल गद्रे यांनी आज (२९ डिसेंबर) नागपूरमधील सिव्हिल लाइन येथील उद्योग भवन कार्यालयाला भेट दिली. या भेटीमध्ये नागपूर जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक डी. एम. चोरघडे यांच्याशी अमृत संस्थेच्या योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
अमृत संस्थेच्या योजनांची उद्दिष्ट, लाभार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा, तसेच प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर विचारविनिमय झाला. यावेळी अमृत संस्थेच्याच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. अमृत संस्थेने तयार केलेले कॅलेंडर या वेळी गद्रे यांनी डी. एम. चोरघडे यांना भेट म्हणून दिले. या भेटीमुळे अमृत आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्यातील समन्वय अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.
.....
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment