महेश सेना अध्यक्ष संतोष प्रकाशचंद तोषनिवाल यांची भेट घेऊन महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)च्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
लातूर : महेश सेना अध्यक्ष संतोष प्रकाशचंद तोषनिवाल यांची भेट घेऊन महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)च्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी अमृत पेठ, EDP (उद्योजकता विकास कार्यक्रम) तसेच अमृतच्या इतर विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा, यासाठी आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले.
याप्रसंगी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. शुभम मुळजकर व अमृत मित्र अमित पांडे उपस्थित होते. अमृतच्या योजनांची माहिती समाजातील अधिकाधिक पात्र युवक-युवती व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. अमृत कार्यालय,लातूर
संपर्क क्रमांक- 7391065470
पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग,
मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,
लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment