संस्कृत भाषेशिवाय भारताचे भारतीयत्व सिद्ध होत नाही. वैद्यकशास्त्र वेद उपनिषद यातील संस्कृतचे योगदान अनन्यसाधारण आहे. भारतीयांनी आता मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याची गरज आहे. पूर्वजांचा इतिहास आठवणे ऐवजी तो वाढवण्याची आता गरज आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते, लेखक प्रणव पटवारी यांनी केले.
माजलगाव - संस्कृत भाषेशिवाय भारताचे भारतीयत्व सिद्ध होत नाही. वैद्यकशास्त्र वेद उपनिषद यातील संस्कृतचे योगदान अनन्यसाधारण आहे. भारतीयांनी आता मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याची गरज आहे. पूर्वजांचा इतिहास आठवणे ऐवजी तो वाढवण्याची आता गरज आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते, लेखक प्रणव पटवारी यांनी केले. ते श्री सिद्धेश्वर महाविद्यालयात संस्कृत व इतिहास विभाग आयोजित संस्कृत भाषा आकलन सप्ताह च्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून प्रकाश दुगड (पालक श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुल तथा केंद्रीय सदस्य भा.शि.प्र संस्था अंबाजोगाई ), प्राचार्य प्रो मुकुंद देवर्षी, प्रा. लक्ष्मीकांत सोन्नर, प्रा डॉ गोरक्षनाथ फसले यांची उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे प्रणव पटवारी पुढे बोलताना म्हणाले की भारतातील प्राचीन भाषांच्या शिक्षणातूनच पुढील भरती पिढी सशक्त व बुद्धिमान होईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी तसेच संभाजी महाराजांनी सुद्धा संस्कृतचे जतन व संवर्धन केले या भाषेतून देशाची सांस्कृतिक एकता साधली जाणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती व पंच परिवर्तन प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय प्रा.सुरेशचंद्र नेळगे यांनी केले. मनोगत पर मार्गदर्शन करताना प्राचार्य प्रो. डॉ.मुकुंद देवर्षी म्हणाले की, अनेक भारतीय व विदेशी भाषांचा उगम संस्कृत मधूनच झाला आहे.भाषेची शुद्धता आणि वैज्ञानिक स्पष्टता येण्यासाठी संस्कृत भाषेचे अध्ययन महत्त्वाचे आहे. संस्कृत भाषेची अभिव्यक्ती क्षमता ही वेदकाळापासूनच विकसित झाली आहे. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना संकुलाचे पालक व केंद्रीय सदस्य प्रकाश दुगड म्हणाले की, हिंदू, जैन व बौद्ध या धर्मांची साहित्य संस्कृत भाषेत विपुल प्रमाणात आहे म्हणून ह्या भाषेच्या अध्ययनातूनच भारतीय संस्कृतीचा अधिक उलगडा होईल. संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे तंत्रज्ञान क्षेत्रात सुद्धा संस्कृतचे महत्त्व आता वाढत आहे
म्हणूनच संस्कृत भाषा सप्ताहाचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राघवेंद्र मुळी यांनी केले.या सप्ताह वर्गाचे संयोजन डॉ. केदारनाथ मालू, प्रा प्रतिभा जाधव, प्रा लक्ष्मीकांत सोन्नर, गोरक्षनाथ फसले, प्रा सुरेशचंद्र नेळगे यांनी केले आहे.हे वर्ग दि. 24ते 30ऑगस्ट पर्यंत होणार आहेत.
अमृत कार्यालय,लातूर
संपर्क क्रमांक- 7391065470
पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग,
मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,
लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment